आमदार महेश लांडगेंचाही इंदुरीकर महाजारांना पाठिंबा!

....
nivruti-maharaj-mahesh landage
nivruti-maharaj-mahesh landage

पिंपरी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सदाभाऊ खोत, सुरेश धस यांच्यानंतर भाजपचे आमदार महेश लांडगे हे देखील आता निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या समर्थनार्थ उतरले आहे. इंदुरीकर महाराजांच्या सोबत संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर उभे आहे. महाराजांनी फक्त आवाज द्यावा आम्ही संपूर्ण ताकदीनिशी त्यांच्या समर्थनार्थ उतरू, असा इशारा लांडगे यांनी दिला आहे.

भोसरीतील मोशी या ठिकाणी शिवजयंती आणि महाशिवरात्री निमित्त संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा आयोजित केला होता. त्यानिमित्त  निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन झाले.  लांडगे यांनी या सोहळ्यानिमित्त इंदुरीकर महाराज यांची बैलगाडीतून मिरवणूक काढली होती. यावेळी माजी महापौर राहुल जाधव आणि भाजपाचे नेते-पदाधिकारी उपस्थित होते.

इंदुरीकर महाराजांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केल्याने काही महिला संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी आग्रह धऱला आहे. त्यावरून सध्या राज्यात वातावरण तापले आहे. या त्रासाला कंटाळून आपण कीर्तन सोडून शेती करणार असल्याची उद्विग्नता इंदुरीकरांनी व्यक्त केली होती. त्यावर आता भाजप पूर्पणणे त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे दिसून येत आहे.

या वेळी बोलताना लांडगे म्हणाले की, इंदुरीकर महाराजांनी महाराष्ट्रात प्रबोधनाचे कार्य केले आहे. माझ्यासारख्या तरुणांना वारकरी सांप्रदाय आणि आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा त्यांच्या कीर्तनातून मिळाली आहे. त्यांच्या कीर्तनाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. विनोदी भाषेत प्रबोधनाची शैली निवृत्ती महाराजांकडे आहे. पण, त्यांच्या कीर्तनातील एखाद्या वाक्यांचा आधार घेत आतापर्यंत केलेल्या चांगल्या कामाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एखाद्या समाजप्रबोधन करणाऱ्या व्यक्तीला मानसिक त्रास होईल, बदनामी होईल, असे वातावरण निर्माण करणे योग्य नाही. त्यामुळे आम्ही पिंपरी-चिंचवडकर ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरायला तयार आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com