आमदार लक्ष्मण पवार शांत, सरळ पण कामात वाघ :  फडणवीस  

महाजनादेश यात्रेतील सभा मंगळवारी गेवराईत झाली. सभेला मोठा प्रतिसाद मिळाला तसेच दुचाकी फेरीही मोठी निघाली. मुख्यमंत्र्यांसह पंकजा मुंडे यांनी आमदार लक्ष्मण पवार यांचे कौतुक केले. पंकजा मुंडे यांनीही त्यांचे कौतुक केले.
CM-Munde-In-Gevrai
CM-Munde-In-Gevrai

गेवराई (जि. बीड) :  महाजनादेश सभेला जमलेली गर्दी पाहून आज जरी मतदान  घेतले तरी आमदार लक्ष्मण पवार पुन्हा विजयी होतील. पवार शांत,सरळ, शिस्तबद्ध आणि कामात वाघ असल्याची स्तुतीसुमने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार पवारांवर उधळली. तर, आमदार पवार भ्रष्टाचारमुक्त, प्रामाणिक असल्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. 

महाजनादेश यात्रेची सभा मंगळवारी गेवराईत झाली. सभेलाही मोठी गर्दी जमली. तर, यात्रेच्या स्वागतासाठी त्यांचे पुतणे शिवराज पवार यांच्या नेतृत्वाखाली गढी ते गेवराईदरम्यान निघालेल्या दुचाकी फेरीला मिळालेला मोठा प्रतिसाद आणि घोषणेमुळे वातावरण ढवळून निघाले. 

व्यासपीठावर खासदार प्रितम मुंडे, मंत्री बबनराव लोणीकर, संयोजक आमदार लक्ष्मण पवार, आर. टी. देशमुख, सुरेश धस, संगिता ठोंबरे, भीमराव धोंडे, रमेश आडसकर, राजेंद्र मस्के उपस्थित होते. 

गर्दी पाहून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ही विकास कामांची पावती असून तुमचे आमदार प्रामाणिकपणे काम करत आहेत. आजपर्यंत ते फक्त तुमच्या कामांसाठीच आपल्याला भेटले. त्यांच्या कामांची यादी वाचून दाखवायची म्हटले तर आपल्याला पुढील सभा रद्द करावी लागेल . 

पंकजा मुंडे यांनीही पवारांच्या कामाचे कौतुक केले . लक्ष्मण पवार भ्रष्टाचारमुक्त, संयमी आणि प्रामाणिक असल्याचे सांगत लोकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी सतत कटीबद्ध असतात असे त्या म्हणाल्या. २०१४ पूर्वी गेवराई तालुक्यातील रस्ते हे अत्यंत निकृष्ट होते. परंतु आता गावागावातील रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. पवारांच्या माध्यमातून तालुका विकासाच्या वाटेवर असून ते प्रामाणिक आमदार आहेत.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com