आमदार कुणाल रोहिदास पाटील लढाईसाठी सज्ज

Rohidas-Kunal-Patil
Rohidas-Kunal-Patil

धुळे : देशात सर्वाधिक मते मिळवून माजी पंतप्रधान (कै.) पंडित जवाहरलाल नेहरू यांचे लक्ष वेधत नावारूपाला आलेले कॉंग्रेसचे माजी खासदार (कै.) चुडामण पाटील यांचे नातू आणि धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार कुणाल रोहिदास पाटील निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. गेल्या 2014 मधील निवडणुकीत आमदार पाटील यांनी तब्बल एक लाख दहा हजारांवर विक्रमी मते मिळविली होती.

माजी खासदार चुडामण पाटील हे 1952 ते 1962 अशी दहा वर्षे आमदार आणि त्यानंतर 1977 पर्यंत म्हणजेच पंधरा वर्षे खासदार होते. त्यावेळी लोकसभा निवडणुकीत जनसंघाचे अध्यक्ष नानासाहेब उत्तमराव पाटील यांचा सर्वाधिक मतांनी पराभव करून चुडामण पाटील यांनी पंडित नेहरूंचे लक्ष वेधले होते. स्वातंत्र्यसैनिक माजी खासदार (कै.) चुडामण पाटील यांचे नातू, तर माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे पुत्र म्हणून कुणाल पाटील यांची ओळख असली, तरी त्यांनी लाभलेला समृद्ध राजकीय वारसा आणि कार्यकर्तृत्वातून जिल्हा राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

शैक्षणिक संस्था, जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्ट, खानदेश विकास प्रतिष्ठान आदी संस्थाच्या माध्यमातून विविध घटकांसाठी शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबवून, सामाजिक कार्यातून आमदार पाटील यांनी ठसा निर्माण केला आहे. ऐश्‍वर्य, कुटुंबाची वैभवशाली परंपरा, सुखासीन आयुष्याची संधी असताना, व्यवसाय, उच्च पदावर नोकरीची संधी सोडून ते समाजकारण, राजकारणात पाय रोवून आहेत. धुळे तालुका, जिल्ह्याची अस्मिता वृद्धिंगत व्हावी यासाठी ते धडपडताना दिसतात.

युवक कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यासाठी आमदार कुणाल पाटील सुरवातीचे अडीच महिने गावोगावी फिरले. पुढे विविध जबाबदारीची पदे त्यांनी नेटाने सांभाळली. शासनाच्या योजना गरिबांसह विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पाठपुरावा केला. लोककल्याणाचा ध्यास घेत विधायक कार्याची उभारणी केली. क्रीडा, वत्कृत्व स्पर्धा, रक्तदान शिबिरे, करिअर मार्गदर्शनातून तरुण, जलसंवर्धनाचा "जवाहर पॅटर्न' राबवून शेतकऱ्यांच्या उन्नतीचा ध्यास घेतला. सहकारी प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीला वाव दिला. आजोबा, वडिलांच्या ध्यासाच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्नशील, रोजगारनिर्मितीसाठी धडपड, महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेत त्यांनी समृद्ध वाटचाल सुरू ठेवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com