माणचे आमदार गोरे वापरतात नोंदणी नसलेली गाडी !

माणचे आमदार गोरे वापरतात नोंदणी नसलेली गाडी !
माणचे आमदार गोरे वापरतात नोंदणी नसलेली गाडी !

बिजवडी (जि. सातारा) : माणचे आमदार जयकुमार गोरे यांच्याकडे असलेली रेंज रोव्हर (एम एच 11 बी व्ही 100) ही गाडीची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी केलेली नाही. तरीही ते बिनधास्तपणे अनाधिकृत नंबर वापरून ही गाडी रस्त्यावर फिरवत आहेत. त्यांच्यावर कारवाई करून त्यांची गाडी जप्त करण्याची मागणी म्हसवड पालिकेचे नगरसेवक संग्राम शेटे यांनी आज केली आहे. यासंदर्भात ते न्यायालयातही दाद मागणार आहेत. 

श्री. शेटे यांनी सांगितले की, आमदार गोरे यांच्याकडे रेंज रोवर ही चारचाकी गाडी आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे त्यांनी 12 जून 2015 रोजी एमएच 11 बीव्ही 100 या नंबरसाठी त्यांनी 50 हजार रूपये भरले आहेत. पण आजपर्यंत त्यांना हा नंबर अधिकृतपणे वापरण्याची परवानगी मिळालेली नाही. तरीही आमदार गोरे बिनधास्त पणे आरटीओच्या व पोलिसाच्या नाकावर टिच्चुन ही अनाधिकृत नंबरची रेंजरोवर गाडी वापरत आहेत. 

यासंदर्भात श्री. संग्राम शेटे यांनी 23 मे 2017 रोजी माहितीच्या अधिकारात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे माहिती मागितली होती. त्यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी म्हटले की या वाहन क्रमांकाची नोंदणी अभिलेख निरंक आहेत. म्हणजे सध्या आमदार गोरे वापरत असलेली ही गाडी अनाधिकृत नंबरची आहे. त्यामुळे ही गाडी जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे शेटे यांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com