रावेरचे आमदार जावळेंना मंत्रिपदाचा दर्जा; खडसेंना शह देण्याची खेळी? 

रावेरचे आमदार जावळेंना मंत्रिपदाचा दर्जा; खडसेंना शह देण्याची खेळी? 

जळगाव : जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे हे लेवा समाजाचेही नेते आहेत. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर लेवा समाजाचे भाजपतीलच रावेरचे आमदार हरिभाऊ जावळे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल अशी चर्चा होती. मात्र त्यावेळी चर्चाच ठरली. परंतु आता विधानसभेच्या निवडणूकीस काही महिने शिल्लक असतांना अंतीम टप्प्यात त्यांना कॅबिनेट मंत्रीदर्जाचे कृषी, शिक्षण व संशोधन समितीचे उपाध्यक्षपद देण्यात आले आहे.

मात्र भाजपतर्फे या माध्यमातून एकनाथराव खडसे यांना विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीत "शह' देण्याची खेळी खेळली जात आहे याचीही चर्चा सुरू झाली आहे. 

राज्याच्या कृषी,पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्त्यव्यवसाय विभाग याचंयातर्फे उपसचिव सु.स. धपाटे यांनी यांच्या स्वाक्षरीनिशी अध्यादेश जारी करण्यात आला आहे. आमदार हरिभाऊ जावळे यांची महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असून तीन वर्षासाठी ही नियुक्ती आहे. मात्र राज्य शासनाच्या मर्जी असेल तोपर्यंत हे पद त्यांच्याकडे राहणार आहे.

हरिभाऊ जावळे हे रावेर-यावल (जि.जळगाव)चे आमदार आहेत. यापूर्वी ते रावेर विधानसभा मतदार संघाचे आमदार होते. त्यानंतर रावेर लोकसभा मतदार संघातून भाजपतर्फे दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र सन 2014 च्या निवडणुकीत पक्षाने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली नाही. त्यांना रावेर विधानसभेची उमेदवारी दिली या मतदारसंघातून ते निवडून आले. आमदार जावळे हे लेवा पाटील समाजाचे आहे. माजी मंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे यांच्याच मुक्ताईनगर मतदारसंघाजवळ त्यांचा रावेर-यावल विधानसभा मतदारसंघ आहे.

खडसे यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर लेवा पाटील समाजाचे जिल्हयातील प्रतिनिधी म्हणून हरिभाऊ जावळे यांना मंत्रिपद दिले जाईल अशी चर्चा होती. मात्र त्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली नाही. मात्र आता पक्षाने त्यांना विधानसभा निवडणुका लागण्याच्या अखेरच्या टप्प्यात कॅबिनेट मंत्री दर्जाचे कृषी, शिक्षण व संशोधन समितीचे उपाध्यक्षपद दिले आहे. अखेरच्या टप्प्यात का होईना जावळे यांना पक्षाने न्याय दिल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यात आनंद व्यक्त होत आहे. या माध्यमातून लेवा पाटील समाजाला मंत्रिपदाच्या दर्जाचे प्रतिनिधीत्वही पक्षाने दिले आहे. मात्र याच समाजाचे जिल्ह्यातील नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना या माध्यमातून पक्षातर्फे शह देण्याचा प्रयत्न सुरू आहे काय, यावरही आता चर्चा सुरू झाली आहे.

जावळे यांचा रावेर-यावल विधानसभा मतदार संघ एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघाला लागूनच आहे. या नियुक्तीमुळे जावळेंची रावेर-यावलची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com