आमदार हिरामण खोसकरांचे इंदुरीकर महारांजांनी केले कौतुक 

ह. भ प. निवृत्ती महाराज इंदुरीकरांचे कीर्तन महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती अन् सोशल मिडीयावर धुम करते आहे ते त्यांच्या राजकारण्यांवरील टीकेसाठी. मात्र काल त्यांचे कीर्तन चर्चेत आले ते त्यांनी काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांची न थकता केलेली स्तुती आणि कौतुकासाठी
Mla Hiraman Khoskar Participated in Kirtan
Mla Hiraman Khoskar Participated in Kirtan

नाशिक  : ह. भ  प. निवृत्ती महाराज इंदुरीकरांचे कीर्तन महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती अन् सोशल मिडीयावर धुम करते आहे ते त्यांच्या राजकारण्यांवरील टीकेसाठी. मात्र काल त्यांचे कीर्तन चर्चेत आले ते त्यांनी काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांची न थकता केलेली स्तुती आणि कौतुकासाठी. कारण होते आमदार खोसकर दोन तास त्यांच्या कीर्तनात टाळ वाजवत भक्तीत हरवल्याचे!

छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार, ब्रिटीशकालीन अस्वली रेल्वे स्टेशन, पाठच्या दशकात हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण आणि भारतीय तोफखान्याची फायरींग रेंज यासाठी नांदगाव सदो (इगतपुरी) ख्यातनाम आहे. काल ते चर्चेचा विषय ठरले ते इंदुरीकर महाराज याच्या किर्तनाने. या कार्यासाठी मोठ्या प्रमाणात पंचक्रोशीतील लोक जमले होते. त्यामुळे राजकीय नेत्यांची गर्दी होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप गुळवे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांसह आले होते. यावेळी आमदार खोसकर थेट व्यासपीठावर गेले. महाराजांच्या पायाला स्पर्श करून टाळ घेऊन भजनाला सुरवात करीत कीर्तनात सेवेला उभे राहिले. सलग दोन तास ते टाळ वाजवत साथ देत होते. 

एरव्ही राजकारणावर कोरडे ओढणार इंदुरीकर यांनी राजकारणावर टिका केलीच. मात्र ''तुम्हाला असा आमदार लाभला. भाग्य आहे महाराज. सोप्प नाही. दोन तास टाळ घेऊन ते कीर्तनात आहेत. असे कुठेच होत नाही. हा माणूस साधा नाही. युवकांनी त्यांचा गुण घ्यावा. दीड महिन्यापूर्वी सगळे एकमेकांचे कपडे पाडत होते. आता त्यांना कुठेच भाव राहिले नाही. या आमदारांकडून हा गुण शिका,'' असे म्हणत इंदुरीकर महाजार बराच वेळ ते आपल्या खास शैलीत आमदार खोसकर यांची स्तुती करीत होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com