पेट्रोलचे वाढते दर पाहून लोक मोदींचे बोर्ड पेटवून देतात की काय? 

पेट्रोल पंपावर लावलेले दर रोजच बदलत आहेत.
पेट्रोलचे वाढते दर पाहून लोक मोदींचे बोर्ड पेटवून देतात की काय? 

कोल्हापूर :  गेल्या वर्षभरात पेट्रोलचा दर 11 रुपयांनी वाढला आहे. पेट्रोल पंपावर लावलेले दर रोजच बदलत आहेत. हे बघून लोक आता मोदींना शिव्या द्यायला लागले आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी केली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने शनिवारी(ता.27) युवा आक्रोश परिषदेचे आयोजन केले आहे. त्याच्या तयारी बैठकीत ते बोलत होते. 

आमदार मुश्रीफ म्हणाले, पेट्रोलचा दर दररोज 15 पैसे, 25 पैसे, 50 पैशांनी वाढत आहे. गेल्या वर्षभरात पेट्रोलचा दर 11 रुपयांनी वाढला आहे. पेट्रोल पंपावर लावलेले दर रोजच बदलत आहेत. हे बघून लोक आता मोदींना शिव्या द्यायला लागले आहेत. पेट्रोलचे वाढते दर पाहून, लोक संतापून हे बोर्ड पेटवून देतात की काय? अशी परिस्थिती आहे. सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरत असल्याचे सांगत सरकार विरोधी वातावरणाला हवा देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार सर्व आघाड्यावर अपयशी ठरले आहे. सर्वसामान्य जनेतसह सर्वच क्षेत्रातील लोकांनी या सरकारचं काय करायचं, ते ठरवलं आहे. फक्‍त सरकारविरोधी या वातावरणाला तुम्ही हवा द्या, मोठी चालना द्या. आणि येणाऱ्या 27 तारखेला होणारी युवा एल्गार परिषद यशस्वी करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com