MLA Harshwardhan Jadhav takes psychiatrists along with him in Maratha youth awareness rally | Sarkarnama

आमदार हर्षवर्धन जाधवांची मानसोपचार तज्ज्ञांसह मराठा युवा ‘मन’ परिवर्तन यात्रा

दत्ता देशमुख 
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

आमदार हर्षवर्धन जाधव यांनी यात्रा सुरु केली आहे. आमदार जाधव यांची मराठा युवा ‘मन’ परिवर्तन यात्रा बीड जिल्ह्यात पोचली. मराठा आरक्षणासाठी पहिले बलीदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्या राज्यातील पहिल्या भडंगवाडी (ता. गेवराई) येथील स्मारकासही श्री. जाधव यांनी भेट दिली.

बीड : " आरक्षण हा मराठा समाजाचा हक्क असून तो मिळणारच आहे. सरकारला तो हक्क दिल्याशिवाय पर्याय  नाही. मात्र, आरक्षणासाठी हिंसक घटना आणि आत्महत्येसारखा मार्ग तरुणांनी स्विकारु नये ,"असे आवाहन कन्नड (औरंगाबाद) येथील आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले. 

श्री. जाधव यांनी सुरु केलेली मराठा युवा ‘मन’ परिवर्तन यात्रा शुक्रवारी जिल्ह्यात आली. त्यांनी भडंगवाडी (ता. गेवराई) येथे मराठा आरक्षणासाठी बलिदान देणारे काकासाहेब शिंदे यांच्या राज्यातील पहिल्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर ही यात्रा सायंकाळी बीडमध्ये आली. मानसोपचार तज्ज्ञांना सोबतीला घेऊन निघालेल्या यात्रेत श्री. जाधव यांनी युवकांशी संवाद साधला. 

"आरक्षणासाठी सुरु असलेल्या लढ्याला यश मिळेल. मात्र, आपली जिवनयात्रा संपवून कुटूंबांना उघड्यावर पाडू नका. आरक्षण चळवळीतील प्रत्येक युवकावर समाजातील जेष्ठांनी लक्ष ठेवावे. त्याच्या वागण्याबोलण्यात फरक दिसल्यानंतर तत्काळ त्याचे मनपरिवर्तन करावे. त्यासाठी आमच्या यात्रेतील डॉक्टरांशी संपर्क साधावा.  आम्हीही त्याचे मनपरिवर्तन करु ,''असे हर्षवर्धन जाधव म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख