तटकरे साहेब पाठीशी असतांना मला कुणाची भीती ? - धैर्यशील पाटील  

Dhairyasheel-Patil- praises Sunil- Tatkare
Dhairyasheel-Patil- praises Sunil- Tatkare

नागोठणे  :  सुनील  तटकरे साहेबांसारखा खासदार माझ्या पाठीशी असतांना तर मला कुणाचीही भिती बाळगण्याचे कारण नाही , असा विश्वास शेकापचे आमदार धैर्यशील पाटील यांनी व्यक्त केला.

अंबा नदी घाट व परिसर सुधारणा कामांचे उद्घाटन आमदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते व आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.5) दुपारी संपन्न झाले झाले. त्यानंतर येथील आराधना भवनात झालेल्या शेकाप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व आर,पी.आय. कवाडे गट आघाडीच्या सभेत ते बोलत होते.

आमदार धैर्यशील पाटील पुढे म्हणाले , लोकसभेत आम्ही नागोठणे जिल्हा परिषद मतदार संघ सोडून सर्वत्र मताधिक्य गृहीत धरत होतो. मात्र नागोठण्याने चांगला लीड घेतला . हे आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेले कौतुकास्पद काम आहे. जे गेली पावणेपाच वर्षे घराबाहेर पडले नाही ते आज मते मागायला बाहेर पडत आहेत . 

आ.  अनिकेत तटकरे म्हणाले की, तटकरे साहेबांच्या पक्षांतराच्या अफवांकडे लक्ष देऊ नका. आम्ही कायम पवार साहेबांबरोबारच राहणार आहोत असे साहेबांनी स्पष्ट केले आहे.  तटकरे साहेब हाच आमचा पक्ष मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत .  बॅ. अंतुले साहेबांवर प्रेम करणारी माणसे आपल्या सोबत असल्याने जातीय शक्तींचा कडेलोट करण्याची ही पुन्हा वेळ आहे.   धैर्यशीलदादा आपली हॅट्रिक पूर्ण करतीलच असा मला विश्वास आहे. 

राष्ट्रवादीचे नेते नरेंद्रशेठ जैन, शिवराम शिंदे, भाई टके, शेकाप नेते नारायण भोईर गुरुजी, अनंत वाघ, फरमानशेठ दाफेदार, रोहा पं.स. सदस्य बिलाल कुरेशी, अशपाक पानसरे, रियाज अधिकारी, विलास चौलकर, प्रकाश जैन, अनिल काळे, बाळासाहेब टके, हिराजी शिंदे, सचिन कळसकर, संतोष कोळी, अतुल काळे, विनय गोळे, दिनेश घाग, जयराम पवार, डाॅ. अनवर हाफिज, अरुण शिर्के, विकास शिर्के, एकनाथ ठाकूर, आशा शिर्के, सुजाता जवके, प्रतिभा तेरडे, कांचनताई माळी, रंजना माळी आदींसह आघाडीचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नारायण भोईर गुरुजी यांनी सभेचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन सुजाता नांदगावकर यांनी तर आभार प्रदर्शन अनंत वाघ यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com