#MaharashtraBudget2020 : आमदार विकास निधी आता २ कोटी रुपयांवरून ३ कोटी रुपये

Ajit Pawar Incresed MLA Development Fund
Ajit Pawar Incresed MLA Development Fund

मुंबई : राज्यातील आमदारांना आपल्या मतदारसंघांचा विकास करण्यासाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या निधीत अर्थमंत्री अजित पवार यांनी भरघोस वाढ केली आहे. या पुढे आमदारांना तीन कोटी रुपयांचा विकास निधी मिळणार आहे.

राज्यातल्या महाविकास आघाडीचे सरकार शंभर दिवस पूर्ण करण्याच्या मुहुर्तावर पवार यांनी आज विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प मांडला. त्यावेळी त्यांनी नितीन गडकरींचे अभिनंदन केले. राज्यातील वाहतुक सुधारण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनाही त्यांनी विधानसभेत मांडल्या.

अर्थसंकल्पातल्या काही ठळक योजना 
- ग्रामीण भागात बसमध्ये वायफाय
- एसटीच्या १६०० जुन्या बस बदलणार
- नागरी सडक योजना राबवण्यात येणार
- ३१३ अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणार
- शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी १० हजार कोटींची योजना
- मराठी नाट्य संमोलनाला १० कोटींची मदत
- नोकरी करणाऱ्या १००० महिलांसाठी पुणे येथे  वसतिगृह 
- मुंबईत मराठी भाषा भवन बांधणार
- राष्ट्रीय पेयजल योजना जलजीवन योजना म्हणून सुरु करणार
- प्रत्येक जिल्ह्यात एक महिला पोलीस स्टेशन
- स्थानिक युवकांना 80 टक्के नोकरी मिळावी यासाठी कायदा 
- 20 डायलेसेस केंद्र आणखी सुरू करणार
- पुणे मेट्रोसाठी अतिरिक्त निधी
- शेतकरी कर्जमाफीसाठी सात हजार कोटींचा अतिरिक्त निधी
- तृतीय पंथीयांसाठी मंडळाची स्थापना, ५ कोटींचा निधी
- ठाण्यात हज हाऊस बांधणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com