विंधनविहीर देऊन आमदार दीपिका चव्हाणांनी पाळला शब्द

बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून आत्महत्याग्रस्त शेतकरी (कै.) नितीन बेडीस कुटुंबियांना विंधनविहीरीसह वीजपंप बसवून दिला आहे. आमदार चव्हाण यांनी बेडीस कुटुंबियांना दिलेला शब्द पाळला. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला.
विंधनविहीर देऊन आमदार दीपिका चव्हाणांनी पाळला शब्द

नाशिक  : बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून आत्महत्याग्रस्त शेतकरी (कै.) नितीन बेडीस कुटुंबियांना विंधनविहीरीसह वीजपंप बसवून दिला आहे. आमदार चव्हाण यांनी बेडीस कुटुंबियांना दिलेला शब्द पाळला. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला.

शेतकरी आत्महत्या नेहेमीच चर्चा, चिंता अन्् राजकारणाचा विषयही असतो. शेतकरी आत्महत्या झाली की आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी कुटुंबीयांच्या सात्वंनासाठी रीघ लावतात. विविध घोषणा करतात. मात्र, शेतकरी कुटुंबाला दिलासा मिळेल अशी ठोस कामे क्वचीतच होतात. बागलाणच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी मात्र एक वेगळे उदाहरण समाजापुढे ठेवले आहे. या कुटुंबाला कायमस्वरुपी आधार देण्याचे काम त्यांनी केले आहे.

गतवर्षी 8 मार्च, 2017 रोजी जोरण (बागलाण) येथील युवा शेतकरी नितीन बेडीस यांनी कर्जाला कंटाळून स्वतःच्या शेतातील विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. घरातील कर्त्या व्यक्तीच्या आत्महत्येमुळे बेडीस कुटुंबीय उध्वस्त झाले होते. आमदार चव्हाण यांनी बेडीस कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यावेळी आमदार सौ.चव्हाण यांनी बेडीस कुटूंबियांना कायमस्वरुपी उदरनिर्वाह तसेच स्वयंपुर्ण होण्यासाठी काय करता येईल याचा विचारविनिमय केला. त्यांनी यांच्या शेतात विंधनविहीरीसह वीजपंप बसवून देणार असल्याचे वचन दिले होते.

त्यानंतर आठ महिन्याच्या आत आमदार सौ.चव्हाण यांनी आपले वचन पूर्ण केले आहे. विंधन विहिरीच्या कामालाही सुरवात झाली. त्यामुळे जोरणचे माजी उपसरपंच सुभाष सावकार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील यांसह गावातील पदाधिका-यांनी त्यांचा सत्कार केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com