आजचे वाढदिवस, मधुकरराव पिचड,शिवाजीराव कर्डिले

आजचे वाढदिवस, मधुकरराव पिचड,शिवाजीराव कर्डिले

मधुकरराव पिचड : माजी मंत्री, आमदार. 
जन्म ः 1 जून 1941 
मतदार संघ ः अकोले विधानसभा (जि.नगर) 
पक्ष ः राष्ट्रवादी 
शिक्षण ः बी. ए. एलएल.बी. 
मधुकरराव पिचड हे आदिवासींचे नेते म्हणून राज्यात ओळखले जातात. अकोले तालुक्‍यात त्यांनी अगस्ती सहकारी साखर कारखाना, राजूर सहकारी दूध संस्था, आदिवासी उन्नती सेवा मंडळ या सस्था स्थापन केल्या. तसेच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे ते कार्याध्यक्ष होते. ते सहा वेळा आमदार झाले. दोनदा मंत्री तर त्यातील एकदा राज्यमंत्री होते. आदिवासी विकास, वन व पर्यावरण, पशुसंवर्धन, दुग्धविकास व परिवहन ही खाती त्यांनी मंत्री असताना सांभाळली. 1995-99 या दरम्यान विरोधी पक्षनेते होते. आदिवासी भागातील प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. अकोले तालुक्‍यातीलच नव्हे, तर राज्यातील आदिवासींचे संघटन त्यांनी केले. 
------------------------------- 
शिवाजीराव भानुदास कर्डिले, आमदार 
जन्म ः 1 जून 1958 
मतदार संघ ः राहुरी विधानसभा 
पक्ष ः भाजप 
आमदार कर्डिले यांचा दूध उत्पादक ते मंत्री असा प्रवास झाला. बुऱ्हाणनगरचे सरपंचपदापासून त्यांनी विविध पदे भुषविली. बाणेश्‍वर शिक्षण संस्था, बाणेश्‍वर सेवा सहकारी संस्था, बाणेश्‍वर सहकारी दूध संस्थांची त्यांनी स्थापना केली. ते सलग चार वेळा आमदार झाले. मत्स्य व बंदरे विकास राज्यमंत्री तसेच पालकमंत्री म्हणून त्यांनी पदे भूषविली. याबरोबरच जलसंधारण महामंडळाचे उपाध्यक्षपद, शेतकरी विचार दलाचे मार्गदर्शक, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद अशी विविध पदे त्यांनी भूषविली. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर कर्डिले यांनी कायम लढा दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com