आमदारांच्या विधीमंडळ कामगिरीत भीमराव धोंडे टॉप तर आर. टी. देशमुख डाऊन

आष्टी - पाटोदा - शिरुर कासार मतदार संघाचे भाजप आमदार भीमराव धोंडे यांनी सर्वाधिक ४३ प्रश्न उपस्थित केले तर, माजलगावचे भाजप आमदार आर. टी. देशमुख यांनी केवळ तीनच प्रश्न विचारल्याचे संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.
Bhimrao Dhonde - RT Deshmukh
Bhimrao Dhonde - RT Deshmukh

बीड : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानंतर सर्वांकडून विकासाचे दावे, सामान्यांच्या प्रश्नांची असलेली तळमळ सांगीतली जात आहे. मात्र, सरत्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील आमदारांच्या विधीमंडळातील कामगिरीचा लेखाजोखा काढल्यानंतर आष्टी - पाटोदा - शिरुर कासारचे आमदार भीमराव धोंडे टॉप तर माजलगावचे भाजचेच आमदार आर. टी. देशमुख यांची कामगिरी अगदीच डाऊन आहे.

पाच वर्षांच्या कार्यकाळातील १३ अधिवेशनातील आमदारांची उपस्थिती, त्यांनी सरकाराला विचारलेले प्रश्न याबाबत संपर्क या संस्थेच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. भाजप आमदार भीमराव धोंडेंच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये विधानसभेत उपस्थितीचे प्रमाण ८९ टक्के आहे. तर, प्रश्न विचारण्यातही ते सर्वात अव्वल ठरले आहेत. त्यांनी ४३ प्रश्न विचारले आहेत. जिल्ह्यातील पाच आमदारांनी (मंत्री वगळता) एकूण ७४ प्रश्न विचारले आहेत. म्हणजेच निम्म्याहून अधिक प्रश्न एकट्या धोंडे यांनीच विचारले आहेत. त्यांनी आरोग्य, महिलांच्या समस्या, आरोग्य केंद्रांची अपुरी संख्या, शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलींचे घटलेले प्रमाण, शिक्षण व पाणी आदींबाबत चर्चा, लक्षवेधी सूचना, तारांकित प्रश्न उपस्थित केले आहेत. 

त्यांच्या पाठोपाठ गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या उपस्थितीचे प्रमाण ८६ टक्के असून त्यांनी १० प्रश्न विचारले आहे. जयदत्त क्षीरसागर मंत्री होण्यापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार असताना नऊ प्रश्न विचारले असून त्यांची उपस्थिती ८० टक्के आहे. भाजप आमदार संगीता ठोंबरे यांनी नऊ प्रश्न विचारले असून त्यांची उपस्थिती ८१ टक्के आहे. भाजप आमदार आर. टी. देशमुख यांच्या अधिवेशनातील कामगिरी इतर आमदारांच्या तुलनेत अगदीच डाऊन असल्याचे या संस्थेच्या अहवालातून समोर आले आहे. त्यांनी केवळ तीन प्रश्न विचारले असून त्यांची उपस्थिती ८६  टक्के आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com