MLA Bhimrao Dhonde Birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : आमदार भीमराव धोंडे, आष्टी - पाटोदा - शिरुर मतदार संघ

दत्ता देशमुख
रविवार, 5 ऑगस्ट 2018

आजचा वाढदिवस : आमदार भीमराव धोंडे (जन्मतारिख ०५ ऑगस्ट १९५५)

बीड : आष्टी - पाटोदा - शिरुर मतदार संघातील भाजपचे आमदार भिमराव धोंडे यांची आमदारकीची ही चौथी टर्म आहे. यापूर्वी तीन वेळा त्यांनी काँग्रेसकडून या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे.

आष्टी - पाटोदा - शिरुर मतदार संघातील भाजपचे आमदार भिमराव धोंडे यांची आमदारकीची ही चौथी टर्म आहे. यापूर्वी तीन वेळा त्यांनी काँग्रेसकडून या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. आष्टी रूई नालकोल या खेड्यागावातून आलेल्या भिमराव धोंडे यांनी आपली राजकीय सुरुवात विद्यार्थी संसद निवडणूकीच्या माध्यमातून केली. सुरुवातीला अपक्ष रिंगणात उतरलेले धोंडे पराभूत झाले. पण, पुढे सलग तीन वेळा काँग्रेस पक्षाकडून आमदार झाले. यावेळी त्यांनी भाजपच्या उमेवारीवर निवडणुक जिंकली. एक वेळेस त्यांनी काँग्रेस पक्ष समांतर काँग्रेस पक्षाची स्थापना केली.

संरक्षण विभागाकडून जमिन संपादनाच्या मुद्द्यावर त्यांच्या नेतृत्वाखाली आष्टी ते दिल्ली हा १२०० किलोमिटर अंतराची ऐतिहासिक पायी दिंडी काढली. तसेच कुकडी धरणाच्या पाण्यासाठी आष्टी ते मुंबई आणि आष्टी ते बीड असेही मोर्चे त्यांनी काढले. महाविद्यालय जीवनापासून कुस्तीचा छंद असलेले भिमराव धोंडे यांनी स्पर्धांमध्ये पदकांचीही कमाई केलेली आहे. सध्याही ते नित्याने व्यायाम करतात. तसेच शेतकऱ्याच्या जिवनावर असलेल्या ‘संघर्ष’ या चित्रपटाची निर्मिती आणि त्यामध्ये त्यांनी भूमिकाही साकारलेली आहे. मतदार संघातील शैक्षणिक संस्थांचे जाळे आणि माळी समाज बांधवांची साथ या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख