आमदार भास्कर जाधव म्हणाले,  पक्ष बदलणे सोपी गोष्ट नाही !

भास्कर जाधव यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम केला आणि शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला होता . त्यामुळे त्यांनी केलेल्या या विधानाची उपस्थितीत चर्चा होती .
bhaskar-jadhav-@mla
bhaskar-jadhav-@mla

गुहागर : राजकारण तर झालेच पाहिजे. त्याशिवाय काम करायला मजा वाटत नाही. फक्त मित्रांनी पाठीत खंजीर खुपसू नये. समोर येऊन लढाई करावी. अशा लढाया खेळण्यात आव्हान असते. मी राजकीय जीवनात अनेक चढ उतार पाहिलेत. आव्हानांना सामोरे जाऊन यशस्वीही झालो आहे,  असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी केले.


भास्कर जाधव यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम केला आणि शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला होता . त्यामुळे त्यांनी केलेल्या या विधानाची उपस्थितीत चर्चा होती . 


शृंगारतळीत कुसुमताई सहकारी पतसंस्थेच्या उद्‌घाटन कार्यक्रमात राजकीय नेत्याच्या कोट्या आणि कोपरखळ्यानी रंगत आली. रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांनी नावातच सर्व काही आहे असे सांगितले.

ते म्हणाले ,  स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेला अध्यात्माचा वारसा आहे तर कुसुमताईच्या नावाला मातीचा सुगंध आहे. गुहागरमध्ये तळपणारा भास्कर उद्‌घाटक आहे. शृंगारतळी शाखेच्या संचालनासाठी येथील विविध क्षेत्रातील अनेक मोती एका माळेत गुंफण्याचे काम शेवडे यांनी केले आहे. त्यामुळे ही पतसंस्था राजकारण न करता निःपक्षपणे काम करेल. 


 हाच धागा पकडत आमदार जाधव यांनी आपल्या भाषणात राजकारण झालेच पाहिजे. मित्र म्हणून पाठीत खंजीर खुपसू नका अशी कोटी केली. जाधव म्हणाले की, पक्ष बदलणे ही सोपी गोष्ट नाही. बदललेली निशाणी, विचारसरणी यातही टिकून राहाणे आवश्‍यक असते.


गुहागर नगरपंचायतीमधील पराभवाचे शल्य आजही जाधवांना आहे,याचा पडताळा आला.ते म्हणाले, गुहागरचा विकास होण्यासाठी लोकसंख्या आणि उत्पन्न कमी असूनही नगरपंचायतीला केंद्र आणि राज्यातून निधी मिळवून दिला. एलईडी दिव्याने शहर आणि समुद्रकिनारा उजळला. चेजींग रुमसह अनेक सुविधा समुद्रावर निर्माण केल्या. मात्र दुपारच्या झोपेसाठी आग्रही असलेल्यांना हा विकास रुचला नाही.

भाजप कार्यकर्तेही बुचकळ्यात
विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आल्यावर गुहागरमध्ये आलो नाही. मतदारांचे आभार मानण्यासाठी मोठा कार्यक्रम करणार आहे. त्यावेळी विठ्ठल भालेकर, प्रशांत शिरगांवकर, स्मिता धामणस्कर यांनाही सन्मानाने बोलावणार आहे. असे भास्कर जाधव यांनी सांगितल्याने उपस्थित भाजप कार्यकर्तेही बुचकळ्यात पडले होते. तर जि.प. सदस्य महेश नाटेकर भास्कर जाधव यांच्या कानात कुजबुजत असताना जिल्हा परिषद सभापतीपदाची पेरणी नाही ना अशी चर्चा सुरु होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com