भास्कर जाधव विरोधकांनाही पाणी पाजण्याच्या तयारीत !

गुहागर व खेड तालुके अनेक वर्षापासून टंचाईग्रस्त आहेत. राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातून या गावातील 76 वाड्या टंचाईमुक्त करण्यासाठी आमदार जाधव यांचे प्रयत्न आहे.
भास्कर जाधव विरोधकांनाही पाणी पाजण्याच्या तयारीत !

चिपळूण:  चिपळूण, गुहागर व खेड तालुक्यातील 37 गावांच्या स्वतंत्र पाणी योजनांसाठी आमदार भास्कर जाधव यांनी 8 कोटी 59 लाखाचा निधी मंजूर करून घेतला. आमदार जाधव यांच्या प्रयत्नामुळे या गावांच्या पाण्याचा प्रश्‍न सुटणार तर आहेच. त्याशिवाय ते आगामी निवडणुकीत विरोधकांना पाणी पाजण्याची तयारी करीत असल्याची राजकीय वतुर्ळात चर्चा सुरू झाली आहे. 

आमदार भास्कर जाधव विरोधी पक्षाचे आमदार आहेत. परंतू विधीमंडळाचा त्यांना प्रदिर्घ अनुभव आहे. कोणत्या योजनेतून किती आणि कसा निधी मंजूर करून घ्यायचा याचे कसब त्यांच्याकडे आहे. त्यांच्यासमोर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, भाजपचे सरचिटणीस डॉ. विनय नातू यांचे आव्हान आहे.

मात्र विरोधी पक्षात असून सुद्धा मतदार संघासाठी सर्वाधिक निधी मंजूर करण्यात ते जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आहेत. गुहागर व खेड तालुके अनेक वर्षापासून टंचाईग्रस्त आहेत. राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातून या गावातील 76 वाड्या टंचाईमुक्त करण्यासाठी आमदार जाधव यांचे प्रयत्न आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com