शिवस्वराज्य यात्रा इंदापुरात आली...पण भरणे समर्थकांना नाराज करून गेली...

शिवस्वराज्य यात्रा इंदापुरात आली...पण भरणे समर्थकांना नाराज करून गेली...

शिवस्वराज्य यात्रेत इंदापूरच्या जागेचा तिढा सुटेल, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या समर्थकांना होती. काॅंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांचाही पुढीलनिर्णय या यात्रेतील भाषणांवर अवलंबून होता. मात्र संयम बाळगण्याचे आवाहन करत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर थेट भाष्य करणे टाळले.

इंदापूर : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेत इंदापूर मतदारसंघ कोणत्या पक्षाला मिळणार, याविषयी भाष्य न झाल्याने राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे यांचे समर्थक नाराज झाले. त्यातच अजित पवार, धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे हे उपस्थित न राहिल्याने या नाराजीत आणखी भर पडली.
 
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा आज इंदापुरात पोहोचली. यावेळी झालेल्या विराट जाहीर सभेत किसनराव खाडे तसेच इतर कार्यकर्त्यांनी चांगले काम करणाऱ्या आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारीच्या घोषणेची मागणी केली.

जयंत पाटील यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा सुरु असून याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. आमदार भरणे यांचे काम चांगले असून कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा असे आवाहन त्यांनी केले.

ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विविध सहकारी संस्था व आमदारकीस काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांविरुद्ध लढत असल्याने त्यामुळे दोन्ही पक्षांत तीव्र संघर्ष आहे. त्यामुळे राज्यात वेगळी परिस्थिती असली तरी इंदापूरमध्ये या दोन्ही पक्षांत थेट लढत असते. त्या पार्श्वभूमीवर ज्या पक्षाचा आमदार निवडून आला आहे, त्यालाच तिकीट हे आघाडीचे सुत्र राहिले आहे. त्या सूत्रावर आधारित आमदार भरणे यांच्याउमेदवारीची घोषणा करण्याची मागणी झाली,  मात्र यावर ठोस उत्तर न मिळाल्याने काही कार्यकर्ते नाराज झाले.

या वेळी जयंत पाटील यांनी  इंदापूर येथील काँग्रेस येथी भवनला अचानक भेट दिली. या वेळी पक्षाचे प्रमुख नेते हर्षवर्धन पाटील किंवा स्थानिक काॅंग्रेस नेते उपस्थित नव्हते. मात्र दोन्ही काॅंग्रेसमध्ये इंदापूर तालुक्यात ताणाचे वातावरण असताना जयंत पाटील यांनी काॅंग्रेस कार्यालयाला भेट देऊन तो ताण कमी करण्याचा प्रयत्न केला. हर्षवर्धन पाटील हे परगावी असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com