MLA Bharat Bhalke Campaign Meeting Malgalwedha | Sarkarnama

पाण्याबाबत लबाड बोलणाऱ्यांना विधानसभेत पाठवू नका - भारत भालके

हुकूम मुलाणी 
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

''आमदाराला राज्यातील प्रश्न विचारून न्याय देण्याचा अधिकार असताना 25 वर्षे रेगाळलेला मंगळवेढ्यातील पाणीप्रश्न माहित नव्हता काय. मग आताच ते तो प्रश्न कसा सोडवू म्हणतात?'' असा सवाल आमदार भारत भालके यांनी प्रचार सभेत उपस्थित केला.

मंगळवेढा : ''आमदाराला राज्यातील प्रश्न विचारून न्याय देण्याचा अधिकार असताना 25 वर्षे रेगाळलेला मंगळवेढ्यातील पाणीप्रश्न माहित नव्हता काय. मग आताच ते तो प्रश्न कसा सोडवू म्हणतात?'' असा सवाल आमदार भारत भालके यांनी प्रचार सभेत उपस्थित केला.

प्रचाराच्या निमित्ताने तालुक्यातील आंधळगाव येथे ते बोलत होते. यावेळी हर्षद बागल लतीफ तांबोळी  संभाजी गावकरे परमेश्वर आवताडे हर्षराज बिले पांडूरंग चौगुले रामचंद्र मळगे ईश्वर गडदे काशीनाथ पाटील पांडूरंग भाकरे महादेव माळी  रामचंद्र लेंडवे सत्यवान लेंडवे संतोष शिंदे ऋतुराज बिले  आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना भालके म्हणाले, "2014 ला पाणी देतो म्हणणारे आताही पाणी देतोच म्हणतात, म्हणून पाण्याबाबत लबाड बोलणारे विधानसभेत पाठवू नका. तीन महिने पाठपुरावा करूनही  पुराचे पाणी दिले नाही. या सरकारला तोंडाला पावडर लावलेली तोंडे चालतात, पण दुष्काळात तोंड करपलेली चालत नाहीत. 267 प्रश्न विधानसभेत विचारणारा तुमच्या समोर आणि 2 प्रश्न विचारणारा तुमच्या समोर आहे. नियम व निकष लावणारे सरकार उलथून टाका.उद्याच्या निवडणूकीत मला निवडून द्या.''

ते पुढे म्हणाले, "अल्पसंख्याक समाजाच्या स्मशानभूमीतून जाणारा महामार्गावर मी लांबून न्यायला लावला.जातीय समीकरणातून धनगर,लिंगायत,उमेदवार देण्याचा प्रयत्न केला ते शक्य झाले नाही म्हणून फोडाफोडी करून मराठा समाजात विभागणी करण्याचा प्रयत्न केला. जे  2009 व 2014 ला माझ्या विरोधात असलेले 2019 ला समोर लढत आहेत.'' माझ्या आजारपणावर विरोधकाकडून आरोप केले जात आहे.आनुवंशिकतेने वडीलांचे आजार मलाच होणार मी अंथरूणावर झोपलो तर तुम्हाला निवडणुकीत आव्हान देवू शकतो, असेही भालके म्हणाले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख