'महाविकास'च्या सत्तेचे आमदार भालके ठरले पहिले लाभार्थी !

महाविकास आघाडीने आता आमदार भालके अध्यक्ष असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कर्जाला हमी दिली आहे.
bharat Bhalke
bharat Bhalke

सोलापूर  : 'महाविकास आघाडीच्या सत्तेचे आमदार भारत  भालके पहिले लाभार्थी ठरले आहेत . महाविकास आघाडीने आता आमदार भालके अध्यक्ष असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कर्जाला हमी दिली आहे.

पंढरपूर तालुक्‍यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला राज्य सहकारी बॅंकेकडून साठ कोटी रुपयांचे अल्प मुदतीचे कर्ज घेण्यास शासनाने हमी दिली आहे. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर या सरकारचे जिल्ह्यातील पहिले लाभार्थी आमदार भारत भालके ठरले आहेत. या कारखान्याला कर्ज देण्यास शासनाने हमी घेतल्याने कारखान्याला आता आर्थिक पाठबळ मिळणार आहे.


कल्याणराव काळे यांच्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना व धनंजय महाडिक यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्याला कर्ज घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शासन हमी दिली होती. राज्यात सत्ता बदल होताच महाविकास आघाडीच्या सरकारने ही हमी काढून घेतली.


 महाविकास आघाडीने आता आमदार भालके अध्यक्ष असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कर्जाला हमी दिली आहे. कारखान्याला ज्या कारणासाठी कर्ज घ्यायचे आहे त्याच कारणास्तव ही रक्कम खर्च करण्याची प्रमुख अट शासनाच्या वित्त विभागाने घातली आहे. 


कारखान्याचे कार्यकारी संचालक/संचालक मंडळातील सदस्यांच्या वैयक्तिक व सामूहिक मालमत्ता तारण ठेवल्यानंतरच या कर्जाच्या रकमेचे वाटप करावे अशी सूचना वित्त विभागाने केली आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने सहवीजनिर्मिती प्रकल्प सुरू करण्यासाठी हे कर्ज घेतल्याची माहिती असून या प्रकल्पाबाबत आवश्‍यक असलेले करार, संयुक्त खाते उघडणे यासह अन्य जबाबदारी साखर आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com