MLA Bharat Bhalke attends Asha Workers program | Sarkarnama

जनतेच्या प्रश्नासाठी मला गर्दीत घुसायची सवय : भारत भालके   

सरकारनामा
बुधवार, 6 फेब्रुवारी 2019

ब्रह्मपुरी :   जनतेच्या प्रश्नासाठी मला गर्दीत घुसायची सवय आहे . सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांसाठी मला रस्त्यावर उतरायची सवय आहे ," असे प्रतिपादन आमदार  भारत भालके  यांनी येथे केले .  मंगळवेढा येथे तालुका आरोग्य अधिकारी विभागाच्या वतीने 'आशा दिवस' या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष अरुणा माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ नंदकुमार शिंदे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले,तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष युवराज शिंदे, डॉ दत्तात्रय शिंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते

आमदार भालके पुढे म्हणाले," महिलांनी सावित्रीबाई फुले विचाराचे अनुकरण करावे . महिला  शिकल्या तर दोन कुटुंबाची प्रगती होते .तुमचे नावच ' आशा' आहे त्यमुळे अशा धरून बसावी लागत आहे . तरीसुद्धा तटपुंज्या रकमेवर काम करीत आहात."

आमदार भालके म्हणाले ,"आज तुम्ही भगिनी जोखमीचे व कष्टाचे काम करत असूनही घामाचा दाम अजूनही मिळत नाही. आशा दिवस आपण साजरा करत आहात.  आशा वर्कर्स प्रत्येक वाडीवस्तीवर जाऊन कुटुंबाची काळजी घेता व कमी पगारावर काम करता . हे  आपले धैर्यच आहे असे  म्हणावे लागेल . अनेक संकटांचा आणि अडचणींचा  सामना करीत  आपण  आरोग्यविषयी प्रबोधन करीत आहात . "

यावेळी  कर्तुत्ववान महिलांचा सत्कार आमदार भारत भालके यांच्या हस्ते करण्यात आला तालुक्यातील मोठ्या संख्येने आशा वर्कर्स व महिला उपस्थित होते. संतोष पोतदार यांनी प्रस्ताविक केले. प्रदीप भोसले यांनी सूत्रसंचालन केले डॉ. नंदकुमार शिंदे यांनी मानले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख