mla bharane`s lucky shirt | Sarkarnama

आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या लकी शर्टची अशीही हॅटट्रिक...

राजकुमार थोरात
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

वालचंदनगर : इंदापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार दत्तात्रेय भरणे यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला. आज भरणे यांना हमखास विजय मिळवून देणारा लकी निळा चौकडा शर्ट परिधान केला होता. त्यांच्या शर्टाने  विजयाची हॅट्रिक साधली.

इंदापूरच्या विधानसभेची निवडणूक अटीतटीची झाली. चुरशीच्या निवडणुकीमध्ये आमदार दत्तात्रेय भरणे यांचा ३२०९ मतांनी विजय झाला. विजयानंतर भरणे यांनी निळा चौकडा शर्ट परिधान केला होता.  या शर्टाने विजयाची हॅट्रिक साधली. २०१२ च्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीच्या निकालादिवशी आमदार भरणे यांनी पहिल्यांदा हा शर्ट घातला होता.यावेळी ते विक्रमी मताधिक्यांनी विजयी होवून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते.

यानंतर दुसऱ्यांना २०१४ च्या विधानसभा निवडणूकीच्या निकालादिवशी पुन्हा हाच शर्ट घातला होता. त्यावेळी ही त्यांना सुमारे १४ हजार मतांनी विजय मिळाला होता. २०१९ च्या निवडणूकीमध्ये भरणे यांनी तिसऱ्यांदा निळा चौकडा शर्ट परिधान केला होता. यावेळी त्यांना विधानसभेच्या निवडणूकीमध्ये ३२०९ मतांनी विजय मिळाला. सर्वसामान्य जनतेने भरणे यांच्या गळ्यामध्ये दुसऱ्यांदा विजयाची माळ घातली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख