mlA BHARANE RESIGNS ON RESERVATION ISSUE | Sarkarnama

आमदार भरणेंचा डबल बार : मराठा आणि धनगर आरक्षणासाठी राजीनामा

राजकुमार थोरात
गुरुवार, 26 जुलै 2018

राज्यातील पाच आमदारांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राजीनामे सादर केले. इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भऱणे यांनी आपल्या पदाचा राजीमाना जाहीर करताना `चौकार` मारला आहे. मराठा, मुस्लिम, धनगर आणि लिंगायत या चारही समाजाची आरक्षणाची मागणी मंजूर होत नसल्याचे सांगत राजीनामा सादर केला. 

वालचंदनगर : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे इंदापूर विधानसभेचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आज आपला राजीनामा दिला. भरणे यांच्या मतदारसंघात दोन्ही समाजाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने भरणे यांची ही खेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी अडचणीची ठरणार का, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या राज्यातील पाच आमदारांनी आतापर्यंत राजीनामे दिले आहेत. त्यात सहावा क्रमांक भरणे यांचा लागला आहे. भरणे यांनी राजीनामा देताना मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत या सर्वच समाजाच्या आरक्षणासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. राज्य सरकारने या चारही समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती. मात्र कायदेशीर अडचणी पुढे करून चारही समाजाच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षाकडे देत असल्याचे स्पष्ट केले. हा राजीनामा विधानसभा अध्यक्षाकडे देत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

शिवसेनेचे हर्षवर्धन जाधव, राष्ट्रवादीचे भाऊसाहेब चिकटगावकर, काॅंग्रेसचे भारत भालके, भाजपच्या सीमा हिरे आणि राहुल आहेर यांनी राजीनाम्याची घोषणा दिली. त्यातील जाधव वगळता इतरांनी आपले राजीनामे मराठा आंदोलनातील कार्यकर्त्यांकडे सुपूर्त केले. आमदारांच्या या राजीनामा सत्रावर मात्र काही कायदेशीर प्रश्न उपस्थित होत आहेत. आमदारांनी हा राजीनामा विधानसभा सभापतींना प्रत्यक्ष भेटून द्यावा लागतो. तसेच राजीनामा देताना त्यात कोणतेही कारण द्यावे लागत नाही. या सर्वच आमदारांनी मराठा आणि इतर आरक्षणाचे कारण त्यात नमूद केल्याने हे राजीनामे मंजूर होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख