आमदार भालकेंनी खदखद व्यक्त केली...म्हणे हा पंढरपूरला शापच आहे..

...
bharat bhalake
bharat bhalake

पंढरपूर : राज्यात विधासभा अस्तित्वात आल्यापासून पंढरपूरच्या आमदाराला एकदाही मंत्रीपद मिळाले नाही. माझी  संधी मिळता मिळता हुकली. पंढरपूरला मंत्रीपद न मिळण्याचा शाप आहे,अशी उद्विग्न भावना राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांनी व्यक्त केली.  मी टोपीवाला आमदार आहे. मलाच  मंत्रीपद मिळेस,  असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. 

आमदार भारत भालके हे पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्यांचा हा कारखाना यंदा बंद आहे. कारखाना बंद असल्याने ते  शेतकरी,कामगार आणि विरोधकांचे एकाच वेळी टीकेचे धनी झाले आहेत. कारखाना बंद असल्याने  या विषयी अधिकच चर्चा सुरू झाल्यानंतर  भालके यांनी माहिती  देण्यासाठी  पत्रकार परिषद घेतली.  यावेळी त्यांनी हुकलेल्या मंत्रीपदाविषयी प्रथमच  भाष्य केलं.  
भालके म्हणाले, पंढरपूर हे मोठे तीर्थक्षेत्र आहे. परंतु एकदाही पंढरपूरला मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही.
यावेळी मला संधी होती. परंतु मीच मंत्रीपदापेक्षा  कारखान्याला मदत करा, असे सांगितले. यापुढच्या काळात पंढरपूरचा टोपीवाला आमदारच मंत्री होईल

पांढरा शुभ्र नेहरू शर्ट आणि खाली पायजमा, डोक्यावर पांढरी गांधी टोपी असा पेहराव.त्यांच्या या  बहरदार व्यक्तीमत्वाचे अनेक जण फॅन देखील आहेत. त्यांच्या टोपीची जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच चर्चा होते. स्पष्ट आणि सडेतोड बोलणे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी हुकलेल्या मंत्रिपदाविषयी हळहळ व्यक्त करत आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com