राष्ट्रवादीच्या बनसोडेंचा शोध लागेना

राष्ट्रवादीच्या बनसोडेंचा शोध लागेना

पिंपरीः राज्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी राखीव मतदारसंघाचे अण्णा बनसोडे हे मिसिंग आहेत. त्यांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. फोन बंद असल्याने ते नक्की कुठे व कशा स्थितीत आहेत,हे कळत नसल्याने पक्षच नाही,तर त्यांचे कुटुंबही काहीसे धास्तावलेले आहे. 

दरम्यान, ते मुंबईतच असल्याचे त्यांच्या निकटवर्तीय असलेल्या पक्षाच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाने आज सांगितले.

अजितदादांच्या समर्थनार्थ अण्णा हे राज्यातील एकमेव आमदार राहिल्याने त्यांची सध्या राज्यभर चर्चा आहे.ते शहरातील पक्षाचे पहिले आमदार आहेत.तसेच ते पिंपरीचे प्रथम आमदार आहेत. अजितदादांमुळेच ते यावेळी पुन्हा आमदार झाले आहेत.कारण प्रथम पिंपरीतून सुलक्षणा शिलवंत-धर या पक्षाच्या नगरसेविकेला उमेदवारी देण्यात आली होती. 

अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दादांनी ती फिरवून अण्णांना दादांनी दिली होती. अजितदादांनी बंड केल्यानंतर त्यांचे अनेक समर्थक आमदार मिसिंग झाले होते.त्यातील काहींना दिल्लीहून शोधून परत काढण्यात आले,तर काही स्वताहून परत आले होते.

आपण पक्षाबरोबर व पवारसाहेबांबरोबर असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला होता.मात्र,अण्णांनी या दोन्हीपैकी एकही मार्ग स्वीकारला नव्हता. त्यामुळे त्यांच्या मिसिंगचे गूढ वाढले होते. ते आजपर्यंत कायम आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांत काहीसे काळजीचे वातावरण आहे.

दरम्यान,सर्वोच्च न्यायालयाने उद्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत आमदारांचा शपथविधी व त्यानंतर बहूमत सिद्ध करण्यास सांगितले आहे.त्यामुळे पिंपरीच्या आमदारांना आता उद्या विधानभवनात प्रगट व्हावेच लागणार आहे.त्यानंतर ते कुठे होते, व कुणाला पाठिंबा देणार हे स्पष्ट होणार आहे.

तर,शहरातील इतर दोन भाजप आमदार अनुक्रमे चिंचवडचे लक्ष्मणभाऊ जगताप आणि भोसरीचे महेशदादा लांडगे हे ही आजच मुंबईला कूच करणार आहेत. कारण त्यांच्या पक्षाची आज रात्री मुंबईत बैठक आहे.उद्या ते सुद्धा पदाची शपथ घेणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com