आमदार बनसोडे आणि सुनील शेळके, हे अजित पवारांचेच : ते काय भूमिका घेणार?

पुणे जिल्ह्यात वेगवान घडामोडी घडण्याची चिन्हे!
आमदार बनसोडे आणि सुनील शेळके, हे अजित पवारांचेच : ते काय भूमिका घेणार?

पिंपरी : राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवडमधील एकमेव आमदार अण्णा बनसोडे हे अजितदादांचे कट्ट्रर समर्थक असल्याने ते त्यांच्याच सोबत राहण्याची दाट शक्यता आहे. मात्र, तूर्त त्यांनी वेट अॅन्ड वॉचची सावध भूमिका घेतली आहे. दिवसभराच्या घडामोडीनंतर सायंकाळी चार वाजता भूमिका स्पष्ट करतो,असे त्यांनी सरकारनामाला सांगितले. तर,अशीच भूमिका मावळचे आमदार सुनील शेळके ऊर्फ अण्णा हे सुद्धा घेण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तविण्यात आली आहे. मात्र, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

भाजप व अजितदादा मिळून सरकार स्थापन करण्याची कल्पना बहुधा अण्णा बनसोडेंना होती.त्यामुळेच ते परवापासून मुंबईत तळ ठोकून होते. शहरातील राष्ट्रवादीचे ते एकमेव आमदार आहेत. २००९ ला ते पिंपरी राखीव मतदारसंघातून निवडून आले होते. तर,गतवेळी २०१४ ला त्यांचा शिवसेनेचे अॅड. गौतम चाबूकस्वारांकडून पराभव झाला होता.यावेळी अॅड चाबूकस्वारांचाच पराभव करून ते निवडून आले आहेत.

राज्यात सत्ता स्थापनेत जसा ऐनवेळी ट्विस्ट आज आला. तसाच तो पिंपरीत राष्ट्रवादीच्या विधानसभेच्या तिकिट वाटपावेळी आला होता. साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या आग्रहास्तव शरद पवार यांनी पिंपरीतून पक्षाच्या नगरसेविका  सुलक्षणा शिलवंत-धर यांना तिकिट दिले होते. मात्र,ऐनवेळी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी ते कापून आपले समर्थक अण्णांना ते दिले होते. त्यामुळे अण्णा हे अजितदादांबरोबरच राहणार यात शंका नाही. पिंपरीच्या आमदारांप्रमाणेच ऐनवेळी राष्ट्रवादीच्या तिकिटाची लॉटरी लागलेले मावळचे आमदार शेळके हे सुद्धा अजितदादांचीच सोबत करण्याची शक्यता आहे. भाजपचे नगरसेवक असलेले शेळके यांना विधानसभेचे तिकिट न मिळाल्याने ऐनवेळी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.त्यानंतर त्यांनी मुंबईत अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांनाही अजितदादांनीच तिकिट दिले होते. त्यामुळे ते सुद्धा अजितदादांची सोबत करतील,असा अंदाज आहे.मात्र,त्यांचा मोबाईल सतत एंगेज आल्याने संपर्क झाला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com