बनकर - कोकाटेसह नाशिकचे सर्व सहा आमदार शरद पवारांसोबतच

..
nasik-ncp-mlas
nasik-ncp-mlas

नाशिक : राजभवन येथे शपथविधीला उपस्थित असलेल्या माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर यांनी ट्‌वीट करुन आम्ही पक्षाबरोबरच आहोत असे स्पष्ट केले आहे. सकाळपासून नॉट रिचेबल असलेलेल नरहरी झीरवाळ यांनीही दुपारी संपर्क झाल्यावर पक्षाच्या हिताविरोधात कदापीही काहीही करणार नाही असे स्पष्ट केले.

त्यामुळे जिल्ह्यातील सर्व सहा आमदार पक्षाबरोबरच राहणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अजित पवार यांना काहीही प्रतिसाद मिळालेला नाही.

आज सकाळी राजभवन येथे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधीला दहा ते अकरा आमदार उपस्थित असल्याचा दावा करण्यात आला होता. प्रसिध्दीस दिलेल्या छायाचित्रात माणिकराव कोकाटे आणि दिलीप बनकर उपस्थित होते हे स्पष्ट झाले.

मात्र त्यांच्याशी काहीही संपर्क होऊ शकला नव्हता. त्यानंतर तिसरे आमदार नरहरी झीरवाळ यांचा संपर्क होत नव्हता. त्यामुळे पक्षाचे नेते त्यासाठी सातत्याने संपर्क करीत होते. हे तीन आणदार अजित पवार यांच्याबरोबर गेल्याची चर्चा पसरली होती.

सकाळी शपथविधीनंतर पक्षाचे वरिष्ठ नेते सक्रीय झाले. त्यांनी सर्व आमदारांशी संपर्क करण्याच्या सुचना दिल्या होत्या. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. ते सरकार स्थापनेच्या प्रक्रीयेत मुंबईत व्यस्त होते. त्यामुळे त्यांनी नाशिकला सुचना दिल्यावर देवळालीच्या आमदार सरोज अहिरे पक्षाचे पदाधिकारी विक्रम कोठुळे आणि अन्य सहकाऱ्यांसह भुजबळ फार्मवर गेल्या. 

नीतीन पवार मुंबईकडे निघाले होते. ते रस्त्यात होते. त्यामुळे ठाणे येथे संपर्क झाल्यावर ते पक्षाच्या नेत्यांकडे गेले. त्यामुळे आता तीन आमदार वगळता इतरांचा संपर्क होत नव्हता. दुपारी दिलीप बनकर यांनी ट्‌वीट करुन मी पक्षाच्या स्थापनेपासून पक्षासोबतच आहे.

पक्षासोबतच राहीन असे स्पष्ट केले. श्री. कोकाटे यांनीही ट्‌वीट करुन पक्षासोबतच असल्याचे कळविले. दुपारी नरहरी झीरवाळ यांच्याशीही संपर्क झाला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व आमदार पक्षासोबत आहेत. अजित पवारांकडे गेले तीघे परतले आहेत. त्यामुळे पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com