mla balasaheb murkute about 9 aug agitation | Sarkarnama

#MarathaReservation 9 ऑगस्टचे आंदोलन करण्याची वेळ येणारच नाही : मुरकुटे 

सुनील गर्जे 
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

मागासवर्गीय आयोगाचा अहवाल 7 ऑगस्ट रोजी आल्यावर आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. त्यामुळे 9 ऑगस्ट रोजीचा मोर्चा काढण्याची वेळ येणार नाही, असा विश्‍वास भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी व्यक्‍त केला. 

नेवासे (जि. नगर) : मागासवर्गीय आयोगाचा अहवाल 7 ऑगस्ट रोजी आल्यावर आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. त्यामुळे 9 ऑगस्ट रोजीचा मोर्चा काढण्याची वेळ येणार नाही, असा विश्‍वास भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी व्यक्‍त केला. 

नेवासे शहरात आरक्षणाच्या मुद्यावर सकल मराठा समाजाच्या कार्येकर्त्यांनी आमदार मुरकुटे यांची गाडी अडवून राजीनाम्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर नेवासे येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुरकुटे यांनी भूमिका मांडली. 

मुरकुटे म्हणाले, "आघाडी सरकारच्या काळात घाईत आरक्षण दिले होते, मात्र ते न्यायालयात टिकले नाही म्हणून कायद्यात बसेल आणि न्यायालयात टिकेल असे आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी विविध आयोग स्थापन केले होते. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येणार असून, तो अहवाल येताच सर्व समाजाला आधार देणारे आरक्षण देण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख