mla bachu kadu | Sarkarnama

तूर खरेदी बंद केली तर मंत्र्यांच्या घरात घुसू- बच्चू कडू

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

अंबाजोगाई : राज्यात 15 एप्रिल पासून सरकार तूर खरेदी करणार नाही या घोषणेच्या पार्श्‍वभूमीवर "तूर खरेदी बंद केली, तर आसूड यात्रा घेऊन 
मंत्र्यांच्या घरात घुसू असा गर्भित इशारा आमदार बच्चू कडू यांनी अंबाजोगाईतील "आसूड' यात्रे दरम्यान दिला. प्रहार व शेतकरी संघटनेतर्फे नागपूर ते वडनगर काढण्यात आलेली आसूड यात्रा गुरुवारी सायंकाळी अंबाजोगाईत होती. यावेळी घेण्यात आलेल्या सभेत बच्चू कडू यांनी हा इशारा दिला. 

केंद्र सरकार कुंभमेळ्यासाठी दोन हजार कोटी रुपये देते, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. नाबार्डचे अधिकारी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर देशाची आर्थिक स्थिती बिघडेल असे सांगतात. मग सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा आयोग दिल्यानंतर देशाची आर्थिक स्थिती सुधारणार आहे का? असा टोला देखील बच्चू कडू यांनी यावेळी लगावला. शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, त्यांना वेळेत कर्जमाफी मिळाली नाही, तर ते बॅंका फोडतील असा धोक्‍याचा इशारा ही त्यांनी दिला. देशाला जगवणारा बळीराजा जगला पाहिजे. त्यासाठी कर्जमाफी आवश्‍यक आहे. केंद्रातील मोदी सरकारने स्वामिनाथन समितीच्या शिफारशी का स्वीकारल्या नाही असा सवाल देखील आसूड यात्रेच्या सभेत करण्यात आला. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख