दुष्काळाची नवी नियमावली करणाऱ्या अधिकाऱ्याच्या कानाखाली  मारणार : बच्चू कडू 

.
Bachhu Kadu
Bachhu Kadu

मुंबई  :  'ज्या केंद्रीय अधिकाऱ्याने दुष्काळाची नवी नियमावली तयार केली, त्याच्या कानाखाली दिल्लीत  जाऊन मारणार आहे ", असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे .  

राज्यात दुष्काळाचा दाह सुरू असताना विधानसभेत  सरकारवर टीकेचे आसूड ओढताना आमदार बच्चू कडू म्हणाले,"  हा पावसाचा दुष्काळ असला, तरी सर्वांत मोठा अन्याय सरकारी धोरणं व सरकारी मानसिकतेनं केला आहे .   सरकार व अधिकारी यांच्या कारभाराच्या विरोधात  मंगळवारपासून  उपोषणाला बसणार आहे .'' 

आमदार बच्चू कडू म्हणाले ,"लोकांनी रामराज्य मागितलं होतं, पण तुम्ही राममंदिरावरच भागवणार असाल, तर लोकं दुधखुळी नाहीत. हे सरकार शेतकरी-शेतमजूर व ग्रामीण जनतेविरोधात आहे .  जलयुक्त शिवारचा दावा बोगस असून, या योजनेच्या यशाबाबत फेकूगिरी सुरू आहे."

पाण्याची भीक मागतोय - खडसे 
भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा सरकारला घरचा आहेर देत सरकारी अधिकाऱ्यांची मुजोरी व्यक्त केली. जळगाव जिल्ह्यात 81 गावांत पाणीटंचाई असतानाही लोडशेडिंगमुळे पाणी मिळत नाही. दुष्काळाच्या उपाययोजना अमलात आणण्यासाठी अधिकाऱ्यांची कमतरता आहे. अगोदर अधिकारी पदे भरा, तरच उपाययोजना होतील, असा दावा केला. या भागातील जनता पाण्यासाठी टाहो फोडत असून, मी सरकारकडे पाण्यासाठी भीक मागत आहे, अशा शब्दांत त्यांनी व्यथा मांडली.

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com