आमदार बच्चू कडूंचा कृषिमंत्री फुंडकरांवर "आसूड' 

आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केवळ भेटीचा दिखावा केला. त्यांनी तेथे मुक्कामी थांबुन सर्व उपाययोजना, दोषींवर तातडीने कारवाई करणे गरजेचे होते. पण पारदर्शक कारभाराचा आव आणनाऱ्या या सरकारमधील मंत्री आणि अधिकाऱ्यांचे औषधी कंपन्यांशी लागेबांधे असल्याने कोणतीच ठोस कारवाई अद्याप झाली नसल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला आहे.
आमदार बच्चू कडूंचा कृषिमंत्री फुंडकरांवर "आसूड' 

अकोला : किटकनाशक फवारणीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचा जीव जात असतांना राज्य सरकार व कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडून केवळ थातुरमातुर कारवाईचा देखावा जात आहे. सरकारच्या अशा शेतकरी विरोधी भुमिकेवर प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी व्यंगचित्र काढून "पांडुरंग' म्हणे ठेविली अनंते तैसेची राहावे; "चित्त असी द्यावे औषधी कंपन्यांवर' "शेतकऱ्यांचे आम्हा काय देणे घेणे' असा जोरदार हल्लाबोल केला आहे. 

त्यांनी यासाठी या "पांडुरंगा'ची वीट खाली खेचणारे व्यंगचित्र ट्विट केले आहे. याबाबत सरकारनामाशी बोलताना कडू म्हणाले, ""किटकनाशकांच्या फवारणीमुळे यवतमाळ, अमरावती, अकोला जिल्ह्यासह राज्यात शेकडो शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. हजारो शेतकरी या फवारणीमुळे गंभीर अवस्थेत आहेत.मात्र निर्लज्जपणाचा कळस गाठणारे हे सरकार आणि त्यांचे मंत्री केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. मुंबईच्या अपघातात मृत्य झालेल्यांच्या वारसांना दहा लाख आणि किटकनाशक फवारणीमुळे मृत्य झालेल्या शेतकऱ्यांना दोन लाख असा भेदभाव सरकार करीत आहे.'' 

"दोन्ही घटनांमध्ये जीवच गेला. मग असा भेदभाव करण्यामागे भाजपचा केवळ राजकीय स्वार्थ लपला आहे. भाजपचे अनेक आमदार हे मुख्यमंत्र्यांना सांगत आहे की शहराकडेच लक्ष द्या. ग्रामीण भागात कमी निधी दिला तरी शहरातील मतदारसंघांच्या भरोश्‍यावर आपण निवडून येऊन पुन्हा सत्ता स्थापन करू शकतो. त्यामुळे या सरकारला ग्रामीन भागाची ताकद पुढच्या निवडणुकीत दाखविल्याशिवाय ग्रामीण जनता स्वस्थ बसणार नाही,'' असा इशारा त्यांनी दिला. 

शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी फुंडकर यवतमाळ जिल्ह्यात जातात. तर तेथे भाजपकडून त्यांच्या स्वागताचे भले मोठे पोस्टर शहरभर लावले गेले. हे शेतकऱ्यांचे सांत्वन करायला गेले की स्वत:चा उदोउदो? हे पाहुन कोणतेही संवेदनशील मन सुन्न होते. किटकनाशक फवारणीच्या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई व्हावी व 
शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी प्रहार संघटना यवतमाळ येथे उद्या तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com