महाआघाडी होईल असं स्वप्नातही वाटल नव्हतं- बच्चू कडू

आमदार बच्चू कडू यांनी आज विधानसभेच देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते झाल्यानंतरच्या अभिनंदनपर भाषणात त्यांची स्तुती केली. पण त्यांना टोलेही लगावले. राज्यात महाविकास आघाडी झाली तसे जिल्हा परिषदांमध्ये काय होईल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला
MLA Bacchu Kadu Praises Devendra Fadanavis
MLA Bacchu Kadu Praises Devendra Fadanavis

मुंबई : उध्दव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होणार अशा बातम्या पेपरमध्ये छापून आल्या, पण टीव्ही लावून पाहिलं तर देवेंद्र फडणवीस आणि अजित दादांनी शपथ घेतली होती. डोळ्यावर विश्‍वास बसत नव्हता, पाणी मारलं, तरी तेच दिसत होतं आणि गेम झाल्याचं लक्षात आलं, असा टोला अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस अशी महाआघाडी होईल अस स्वप्नातही वाटलं नव्हतं, असेही कडू यांनी आपल्या भाषणात सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेते पदावर निवड झाल्यानंतर अभिनंदन प्रस्तावावर बोलतांना बच्चू कडू यांनी त्यांच्या बद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. बच्चू कडू म्हणाले, ''देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना मला त्यांच्या बाबत काही चांगले अनुभव आले. मंत्रालयालीत सहाव्या मजल्यावरून आरोग्य विभागाचे काम त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवले. माझ्या मतदारसंघातील वीरचक्र प्राप्त जवान तानाजी घोडेस्वार यांची अत्यंयात्रा तिरंग्यात काढावी अशी लोकांची इच्छा होती. माझ्या एका एसएमएसवर फडणवीसांनी त्याला परवानगी दिली. मुंबईत जेव्हा मी प्रहार संघटनेच्या माध्यमातून अपंगाचा मोर्चा घेऊन आलो होतो, तेव्हा आमच्याकडे जेवण द्यायला पैसे नव्हते, फडणवीस यांनी मोर्चातील सगळ्यांची व्यवस्था केली होती."

"पण सत्तेच्या स्पर्धेत गेल्या महिनभरात आम्ही कुठच्या पातळीवर गेलो हे महाराष्ट्राने पाहिले. सत्तेवर येता येता तुम्हाला विरोधी पक्षात बसावे लागले. पण काल सभागृहात नव्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत न करता तुम्ही निघून गेलात हे चुकीचे होते, पंचवीस वर्षाच्या मैत्रीचा तरी तुम्ही विचार करायला पाहिजे होता असा टोला देखील बच्चू कडू यांनी फडणवीसांना लगावला,''

जिल्हा परिषद, ग्रामपंचयातीत काय होईल?

राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी व कॉंग्रेसची महाआघाडी झाली, अस काही होईल स्वप्नातही वाटल नव्हंत याचा पुनरुच्चार करतांनाच आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीमध्ये काय होईल? असा प्रश्‍न देखील बच्चू कडू यांनी उपस्थित केला. तुमच्या आमच्या असल्या वागण्याचा जनतेवर काय परिणाम झाला? हे ही आपण पाहिलं पाहिजे असे खडेबोलही बच्चू कडू यांनी भाषणात शेवटी सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com