MLA Bacchu Kadu about Maratha Resrvation | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाची शपथ घेऊन आरक्षण केव्हा देणार हे सांगावे : बच्चु कडू 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 24 जुलै 2018

आमदार बच्चु कडू यांच्या उपस्थितीत नागरीकांच्या प्रश्‍नांसाठी पंचवटी परिसरात त्यांचा जनता दरबार झाला. यावेळी विविध समस्या मांडण्यासाठी नागरीकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी राज्यात सुरु असलेल्या मराठा आंदोलनाविषयी राज्य शासनाने योग्य भूमिका घ्यावी, अशी भूमिका बच्चु कडू यांनी मांडली.

नाशिक : "मराठा, धनगर समाजाने आपल्या मागण्यांसाठी शांततेत आंदोलने केली. त्यामुळे सरकारनेही सर्व काही शांततेत घेतले. कृती केली नाही. मागण्यांसाठी पावले टाकली नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्‍वासार्हता गमावली आहे. आता त्यांच्यावर कोणीच विश्‍वास ठेवणार नाही. त्यांनी विठ्ठलाची शपथ घेऊन आरक्षण केव्हा देणार हे सांगावे," असे आव्हान प्रहार संघटनेचे नेते, आमदार बच्चु कडू यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. 

आमदार बच्चु कडू यांच्या उपस्थितीत नागरीकांच्या प्रश्‍नांसाठी पंचवटी परिसरात त्यांचा जनता दरबार झाला. यावेळी विविध समस्या मांडण्यासाठी नागरीकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी राज्यात सुरु असलेल्या मराठा आंदोलनाविषयी राज्य शासनाने योग्य भूमिका घ्यावी, अशी भूमिका बच्चु कडू यांनी मांडली. आर्थिक निकषावर तसेच अन्य निकषांचा विचार करुन या समाजाच्या मागण्यांचा विचार करुन अभ्यास करणारी समिती नेमावी. लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा, असे कडू म्हणाले.

''जेव्हा दोन वर्षे धनगर, मराठा समाजाने शांततेत आंदोलने केली. मागण्या मांडल्या, मात्र काहीही गांभिर्याने झाले नाही. त्याचा संताप या आंदोलनातुन व्यक्त होत आहे. हे अत्यंत दुर्दैवी असुन ही स्थिती मुख्यमंत्र्यांच्या कार्यपध्दतीमुळे घडली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणाचाही विश्‍वास राहिलेला नाही. त्यामुळे विठ्ठलाच्या पायाशी जाऊन शपथ घेऊन आरक्षण केव्हा देणार हे सांगावे. सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवले तर राज्यातील सर्व आंदोलने संपतील." असेही बच्चु कडू म्हणाले.  

सरकारनामा अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख