अखेर बबनराव शिंदेंना 'ग्रिन सिग्नल' मिळाला!

कार्यकर्त्यांचा मत प्रवाह विचारात घेता शिंदे लवकरच भाजपत प्रवेश करण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
अखेर बबनराव शिंदेंना 'ग्रिन सिग्नल' मिळाला!

पंढरपूर: माढा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बबनराव शिंदे हे गेले काही दिवस भाजपप्रवेशासाठी प्रयत्न करत होते, मात्र त्यांना यश येत नव्हते. अखेर त्यांना प्रवेशासाठी 'ग्रिन सिग्नल' मिळाला आहे. त्यामुळे त्यांनी गटनिहाय बैठका आयोजित केल्या असून त्यात भाजपमध्ये जाण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

राज्यात राष्ट्रवादी- काँग्रेसला सोडून सेना भाजपत प्रवेश करण्यासाठी अनेक नेत्यांची चढाओढ सुरू आहे. सोलापूर जिल्हयातील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत हातात शिवबंधन बांधले आहे. त्यानंतर माढ्याचे आमदार बबन शिंदेनी ही राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीशीर माहिती आहे. अनेक दिवस आमदार शिंदे भाजपत प्रवेशासाठी इच्छुक आहेत पण त्यांना ग्रिन सिग्नल मिळत नव्हता. नुकताच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून शिंदेना प्रवेश देण्यासाठी हिरवा कंदिल मिळाल्यानंतर शिंदेनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी गटवार बैठका सुरू केल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठकीत भाजपत जाण्याचा आग्रह धरला जात आहे. एकूणच कार्यकर्त्यांचा मत प्रवाह विचारात घेता शिंदे लवकरच भाजपत प्रवेश करण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com