माढ्याच्या बबनराव शिंदेंनी मागितली भाजपकडे उमेदवारी 

मागील आठवड्यात श्री शिंदे व त्यांचे बंधू जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजय शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली होती.
माढ्याच्या बबनराव शिंदेंनी मागितली भाजपकडे उमेदवारी 

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी आज रात्री पणन मंत्री तथा भाजपचे सोलापूरचे निरीक्षक राम शिंदे यांची सोलापुरात भेट घेतली.

श्री. शिंदे आज भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी सोलापुरात आले होते. श्री. शिंदे यांनी माढा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या वतीने उमेदवारी मागितली असल्याची चर्चाही आज रात्री सोलापुरात सुरू होती.

भाजपने आज जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. दिवसभर पक्षातील आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघासाठी मुलाखती दिल्या. हॉटेल लोटस येथे दिवसभर सुरू असलेल्या या मुलाखतीच्या कार्यक्रमासाठी सायंकाळी सहा वाजेपर्यंत राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे उपस्थित झाले नव्हते मात्र रात्री आठच्या नंतर त्यांनी राम शिंदे यांची भेट घेऊन उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मागील आठवड्यात श्री शिंदे व त्यांचे बंधू जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजय शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली होती. तेव्हापासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. त्यातच आज श्री शिंदे यांनी राम शिंदे यांची भेट घेतल्यामुळे त्या चर्चांना दुजोरा मिळाला आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार हे उपस्थित होते

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com