बबनदादा शिंदे शरद पवारांच्या गाडीत बसून हाॅटेलवर पोहोचले....

..
babandada shinde reaches to hotel
babandada shinde reaches to hotel

मुंबई : हाॅटेलमध्ये ठेवण्यात आलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या आमदारांची भेट पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली. या वेळी त्यांच्यासोबत माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे हे होते. शिंदे यांनी आज सकाळी पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी भेट घेतली. बबनदादांना आपल्या गाडीत सोबत घेतच पवार यांनी हाॅटेल गाठले. शिंदे यांच्यासोबत खासदार सुनील तटकरे हे पवारांच्या गाडीत होते.

राष्ट्रवादीतही घडामोडी सुरू असून अजित पवार यांची मनधरणी करण्यासाठी दिलीप वळसे पाटील दोन तासापासून अजित पवारांच्या घरात आहेत. जयंत पाटीलही  त्यानंतर अजितदादांच्या घरी गेले. अजित पवारांबरोबर गेलेले अहमदपूरचे आमदार आबासाहेब पाटीलही शरद पवार यांच्याकडे परत येणार असून आपल्याला फसवून नेल्याचा खुलासा करणारा व्हिडिओ आबासाहेब पाटील यांनी जारी केला आहे. दुसरे आमदार दौलत दरोडा यांनीही मी शरद पवार साहेब यांची साथ सोडणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी अजित पवार यांची भेट घेतली.

पवार यांच्या पाठीमागच्या गाडीत सुप्रिया सुळे व इतर नेते होते. राष्ट्रवादीच्या आमदारांशी पवारांनी संवाद साधला. तसेच राजकीय परिस्थिती समजावून सांगितली. बबनदादा शिंदे हे विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी सोडण्याच्या बेतात होते. मात्र शिवसेनेत जायचे की भाजपमध्ये याचा तिढा त्यांचा सुटला नाही. शेवटी ते राष्ट्रवादीतच राहिले. त्यांचे बंधू संजय शिंदे यांना करमाळ्यातून राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार म्हणून पाठिंबा दिला. ते नंतर भाजपकडे गेले. आता तेच शिंदे पवार यांच्या गाडीत असल्याने समीकरणे बदलल्याचे राष्ट्रवादीच्या आमदारांना दिसले.

दुसरीकडे अजित पवार यांचे मन वळविण्याचा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते प्रयत्न करीत आहे. आमदार रोहित पवार यांनी भावनिक पोस्ट लिहून अजितदादांना परत येण्याचे आवाहन केले.  अजित पवार यांची मनधरणी करण्यासाठी दिलीप वळसे पाटील दोन तासापासून अजित पवारांच्या घरात आहेत. जयंत पाटीलही  त्यानंतर अजितदादांच्या घरी गेले. अजित पवारांबरोबर गेलेले अहमदपूरचे आमदार आबासाहेब पाटीलही शरद पवार यांच्याकडे परत येणार असून आपल्याला फसवून नेल्याचा खुलासा करणारा व्हिडिओ आबासाहेब पाटील यांनी जारी केला आहे. दुसरे आमदार दौलत दरोडा यांनीही मी शरद पवार साहेब यांची साथ सोडणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी अजित पवार यांची भेट घेतली.

भारतीय जनता पक्षाने अजूनही आपल्याकडेच विश्वासमत असल्याचा दावा करत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वास भाजपचे नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

शिवसेना तोंडावर आपटली. त्यांचा कार्यक्रम आटोपला आहे, अशा शब्दांत शेलार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. आजच्या आजच विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याचे सांगत अजित पवार यांना कागदपत्रे सादर करण्यास न्यायालयाने अवधी दिल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले. अजित पवार हेच राष्ट्रवादीचे गटनेते आहेत, याचा पुनरूच्चार करत त्यांचाच व्हिप हा आमदारांना मान्य करावा लागेल, असा युक्तिवाद शेलार यांनी केला. दुसरीकडे संजय राऊत यांनीही भाजपवर टीका करत रात्रीच्या अंधारात शपथविधी का उऱकला, असा सवाल विचारला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com