या आमदाराने पोलिस अधिकाऱ्याचे चक्क रस्त्यावर पाय धरले

या आमदाराच्या कृतीचेकाहींनी कौतुक तर काहींनी नौटंकी म्हणून टीका केली आहे.
andhra pradesh mla
andhra pradesh mla

विशाखापट्टणम : कोरोनाच्या विरोधात सुरू असलेल्या लढ्यात पोलिसांवर मोठी जबाबदारी आहे.  या जबाबदारीतून त्यांना कधी कठोर व्हावे लागेत. त्याबद्दल त्यांना टीकाही सहन करावी लागते. त्यांच्या कामाचे कौतुक काही मंडळी करतात. 

राजकीय नेते हे पोलिसांचे बाॅस म्हणून ओळखले जातात. पोलिसांना त्यांना सॅल्यूट करावा लागतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस दल ज्या पद्धतीने काम करते आहे ते पाहून आंध्र प्रदेशच्या एका आमदाराला राहवले नाही. राज्यातील पोलिसांनी लाॅक डाऊन  यशस्वी केल्याबद्दल या आमदाराने एका सहायक फौजदाराचे पाय धरले. पोलिसांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी आपण ही कृती करत असल्याचा दावा या आमदाराने केला.

आंध्र प्रदेशमधील अरकु विधानसभा मतदारसंघाचे आमदार असले्या चेट्टी फाल्गुना हे सोशल मिडियात चर्चेचा विषय बनले आहेत. भर रस्त्यात त्यांना केलेल्या या कृतीमुळे तो अधिकारीही भांबावून गेला पण त्यांनी अटेंशनमध्ये उभे राहून सॅल्यूट करून आमदारांच्या कृतीला प्रतिसाद दिला.

चेट्टी फाल्गूना यांच्या या कृतीबद्दल काहींनी आक्षेप घेत ही नौटंकी असल्याची टीका केली. तसेच पाय धरल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळला नसल्याचेही निरीक्षण काहींनी नोंदविले. आमदा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com