या टर्मला, देशमुख लागले कामाला !

mla deshmukh meets officer
mla deshmukh meets officer

लातूर  : विधानसभा निवडणुकीत लातूर शहराला उजनी धरणातून पाणी आणण्याचा मुद्दा खूप गाजला. कॉंग्रेसचे सरकार आल्यास दोन महिन्यात उजनीतून शहराची पाणी योजना मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार अमित देशमुख यांनी दिले होते.

तर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ही पाणी योजना न मंजूर झाल्यास दोन वर्षात राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. निवडणूकीनंतर आमदार देशमुख यांनी या प्रकरणात पहिले पाऊल टाकत उजनीच्या पाण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना साकडे घातले आहे.


लातूरचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी उजनी धरणातून पाणी पुरवठा करावा, या मागणीचे निवेदन त्यांनी शुक्रवारी (ता. एक) मुख्य सचिवांना दिले. उजनी धरणातून थेट धनेगाव (ता. केज) येथील मांजरा धरणात असलेल्या शहराच्या पाणी योजनेस जलवाहिनी जोडल्यास हे काम तातडीने पूर्ण होऊन लातूरकरांना दिलासा मिळणार आहे. परतीच्या पावसाने हजेरी लावली तरी उपलब्ध पाण्यातून शहराला येत्या फेब्रुवारीपर्यंत महिनाभरातून केवळ एक वेळच पाणी देणे शक्य होणार आहे.


 कायम कमी पर्जन्यमानाच्या छायेत असणाऱ्या या भागाला पिण्याचे पुरेसे पाणी देण्यासाठी उजनी धरणाचा एकच पर्याय आहे. काही वर्षात जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सातत्याने कमी आणि अनियमित होत आहे. मांजरा धरणात वर्षभर पुरेल एवढे पाणी उपलब्ध होत नाही, असा अनुभव आहे. यामुळे पाण्याचा प्रश्न लातूरकरांची पाठ सोडण्यास तयार नाही.

लोकांना नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देऊन कायमस्वरूपी टंचाई दूर करण्यासाठी उजनी ते धनेगाव जलवाहिनी टाकण्यासाठी संबंधित विभागाला निर्देशित करावे, अशी मागणीही आमदार देशमुख यांनी निवेदनात केली आहे. मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन मुख्य सचिवांनी दिल्याचे देशमुख यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com