mla aabitkar criticise chandrakant patil | Sarkarnama

चंद्रकांतदादांनी केला शिवसेना आमदाराचा 'हक्कभंग'!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 19 जानेवारी 2019

आगामी काळात मंत्री पाटील हे याच मतदारसंघात शड्डू ठोकण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर : राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर येणाऱ्या विधानसभेत हक्कभंग मांडणार असल्याचा इशारा आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिला आहे.  

राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल राधानगरी विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे उद्घाटन केले. यावेळी राजशिष्टाचार पाळणे त्यांच्यावर बंधनकारक होते. या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी असताना त्याची मंत्री पाटील यांनी दखल घेतली नसल्याचा आरोप आमदार आबिटकर यांनी केला.

मंत्री पाटील यांनी या मतदारसंघात 550 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. आगामी काळात मंत्री पाटील हे याच मतदारसंघात शड्डू ठोकण्याची शक्यता आहे.  त्यामुळे मंत्री पाटील-आमदार आबिटकर संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता आहे.

यावेळी बिद्री कारखान्याचे माजी संचालक श्री.दत्तात्रय उगले, माजी सभापती श्री.नंदकुमार ढेंगे, केडरचे माजी अध्यक्ष श्री.कल्याणराव निकम, हणबरवाडीचे सरपंच श्री.धनाजीराव खोत सर, गारगोटीचे माजी उपसरपंच अरुण शिंदे, संजय गांधी समितीचे सदस्य संग्रामसिंह सावंत तानाजीराव जाधव आदी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख