Mixed Reaction in Malegaon Over Supreme Court on Ram Mandir Issue | Sarkarnama

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची मालेगावात संमिश्र प्रतिक्रिया

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्यातील निकालाचे मालेगाव येथे स्वागत झाले. याविषयी राज्यमंत्री व शिवसेना नेते दादा भुसे यांनी समाधान व्यक्त केले. या निकालाने सामाजिक एकात्मता व सद् भावना वाढीस लावणारा आहे अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली.

नाशिक : अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्यातील निकालाचे मालेगाव येथे स्वागत झाले. याविषयी राज्यमंत्री व शिवसेना नेते दादा भुसे यांनी समाधान व्यक्त केले. या निकालाने सामाजिक एकात्मता व सद् भावना वाढीस लावणारा आहे अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली.

यावेळी शहरातील विविध राजकीय पक्ष आणि समाजाचे प्रतिनिधी एकत्र आले होते. त्यांनी या निकालावर प्रतिक्रिया दिल्या. यावेळी श्री. भुसे म्हणाले, ''आपण सर्व भारतीय देशाचे संविधान, कायद्याला मानणारे आहोत. सर्वोच्च न्यायालयाचा हा ऐतिहासीक निर्णय आहे. देशाची एकात्मता व अखंडता राखणारा निर्णय. या निर्णयानंतर आम्ही सर्व भारतीय एक आहोत हे जगाला दाखवून द्यायची संधी आहे. सर्व भारतीय मिळून मंदिर व मशिदीचे निर्माण करतील. या निर्णयाचे स्वागत करतो. शांतता, एकात्मतेसाठी आम्ही कटीबध्द आहोत.''

जनता दल धर्मनिरपेक्ष शहर सरचिटणिस मुश्तकीम डिग्निटी यांनीही मात्र वेगळे मत व्यक्त केले. ते म्हणाले, ''शहरातील धर्मनिरपेक्ष नागरिक या निर्णयामुळे नाराज आहे. या निर्णयाचे स्वागत करणार नाही. आस्थाला डोळ्यासमोर ठेवून निर्णय झाला आहे. केरळ मधील शबरीमला प्रश्नी न्यायालयाच्या निर्णयानंतरही लोकशाही मार्गाने विरोध सुरू आहे. आम्हालाही तो हक्क आहे.''

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख