मराठा आरक्षण सुनावणीबाबत चुकीची माहीती पसरवली जातेय : तावडे 

मराठा आरक्षण सुनावणीबाबत चुकीची माहीती पसरवली जातेय : तावडे 

मुंबई : मराठा आरक्षण विषयी सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेल्या सुनावणीनंतर त्यासंदर्भात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न काहीजण करीत आहेत. सरकारी वकील कटनेश्वर यांनी स्पष्ट केले असतानाही, चुकीची माहिती पसरवली जातेय असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. 

यासदंर्भातील तावडे म्हणाले की, राज्य शासनाने मराठा आरक्षणाच्या केलेल्या कायद्यानुसार 12 टक्के शिक्षणात आरक्षण व 13 टक्के नोकरीत आरक्षण देण्यात आले आहे. याला स्थगितीचा आग्रह याचिकाकर्त्यांनी केला. पण सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले की, आम्ही मा. उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत पूर्ण वाचल्याशिवाय त्या निर्णयाला स्थगिती देऊ शकत नाही.

मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने (रेट्रॉस्पेक्‍टीव्ह) लागू करता येत नाही, असे जे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, त्याचासुध्दा चुकीचा अर्थ काढला जात आहे. मराठा आरक्षण रेट्रॉस्पेक्‍टीव्ह पध्दतीने आपण लागू करत नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शिक्षणात टक्के आणि नोकऱ्यांमध्ये टक्के आरक्षणाचा कायदा केला आहे. त्याप्रमाणेच आरक्षण लागू करण्यात येईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com