मीरा-भाईंदर : आमदार नरेंद्र मेहतांना शिविगाळ करत शिवसेना नगरसेवकांचा राडा

विधानसभा निवडणुकीचा तोंडावर मीरा-भाईंदर महापालिकेमध्ये शिवसेना व भाजपा नगरसेवकांमध्ये वाद शिगेला गेल्याने आज राडा झाला.
मीरा-भाईंदर : आमदार नरेंद्र मेहतांना शिविगाळ करत शिवसेना नगरसेवकांचा राडा

भाईंदर - विधानसभा निवडणुकीचा तोंडावर मीरा-भाईंदर महापालिकेमध्ये शिवसेना व भाजपा नगरसेवकांमध्ये वाद शिगेला गेल्याने आज राडा झाला. 

आज महापालिकेत स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कला दालनाच्या विषयाचा समावेश न केल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी भर सभागृहात भाजप सेनेच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याने वाद शिगेला गेला. त्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपाच्या स्थानिक आमदाराला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत महापौर कार्यालय, स्थायी समिती सभागृहाची तोडफोड केली.

मीरा-भाईंदर महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक आज बोलवण्यात आली होती. या बैठकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलादालन आणि प्रमोद महाजन सभागृहाच्या विषयावर चर्चा करण्यात यावी अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. आज स्थायी समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा होणार होती. मात्र, आजही कला दालनाचा विषय नसल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी बैठकीत गोंधळ घालण्यास सुरूवात केली.

स्थानिक आमदार नरेंद्र मेहता हे यात आडकाठी आणत असल्याचा आरोप शिवसेनेने केला. त्यानंतर मेहता यांना शिवीगाळ करत शिवसेना नगरसेवकांनी स्थायी समिती सभागृह, महापौर कार्यालयात तोडफोड केली. यावेळी सभागृहाच्या काचा तोडण्यात आल्या तसेच खुर्च्या फेकून घोषणाबाजी करण्यात आली
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com