ministers | Sarkarnama

बडोले, सावरा, लोणीकरांचा होणार पत्ता कट

ब्रह्मदेव चट्टे : सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 20 एप्रिल 2017

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपच्या प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थित वर्षा बंगल्यावर घेतलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केल्याचे समजते. यामध्ये सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आणि पाणी पुरवठा मंत्री बबन लोणीकर यांचा पत्ता कट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मुनगंटीवार यांच्यासह शिक्षण मंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आदी प्रमुख नेत्यांशी मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला असून यामध्ये मतदार संघातील मंत्र्यांच्या कामाची विशेष दखल घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानुसार सतत वादग्रस्त विधान करून अडचण निर्माण करण्याऱ्या मंत्र्यांविषयी मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या जागी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना बढती मिळणार असून पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

सूत्रांच्या माहितीनुसार आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनाही मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर महिला व बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर व आदिवासी विकास राज्यमंत्री अब्रीशराजे अत्राम यांनाही पर्यायी नावाची चर्चा करण्यात आले असल्याचे समजते. कोअर कमिटीच्या या चर्चेचा अहवाल पक्षाकडे पाठवण्यात येणार असून त्यानुसार या मंत्रीपदाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख