महाविकास आघाडीचे खातेवाटपावर शिक्‍कामोर्तब?

अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीचे खातेवाटप जाहीर होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत अन्य सहा मंत्र्यांनी शपथ घेतली ते देखील बिनखात्याचे मंत्री आहेत. नागपूरचे हिवाळी अधिवेशन तोंडावर आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नव्या मंत्रिमंडळाच्या या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह या मंत्र्यांवर उत्तर देण्याची जबाबदारी असेल
Ministerial Portfolios of NCP Shivsena Congress Likely to be finalised Today
Ministerial Portfolios of NCP Shivsena Congress Likely to be finalised Today

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी होऊन 14 दिवस उलटल्यानंतर महाविकास आघाडी सरकारचे खाते वाटपावर शिक्‍कामोर्तब झाल्याचे समजते. त्यामुळे कोणत्याही क्षणी हे खातेवाटप जाहीर होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये गृह आणि नगरविकास ही महत्त्वाची खाती शिवसेनेकडे, तर गृहनिर्माण आणि अर्थ ही खाती राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असतील, असे सांगण्यात आले. हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची शक्‍यता असताना

अधिवेशनापूर्वी खातेवाटप जाहीर होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत अन्य सहा मंत्र्यांनी शपथ घेतली ते देखील बिनखात्याचे मंत्री आहेत. नागपूरचे हिवाळी अधिवेशन तोंडावर आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नव्या मंत्रिमंडळाच्या या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह या मंत्र्यांवर उत्तर देण्याची जबाबदारी असेल, असेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे पक्षनिहाय खातेवाटप लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळ खातेवाटपाची शक्‍यता
राष्ट्रवादी कॉंग्रेस : अर्थ आणि नियोजन, गृहनिर्माण, कृषी, सार्वजनिक आरोग्य, सहकार, सार्वजनिक बांधकाम.
शिवसेना : गृह, नगरविकास, परिवहन, उद्योग, सामाजिक न्याय, पर्यावरण, उचच व तंत्रशिक्षण.
कॉंग्रेस : महसूल, ऊर्जा, जलसंपदा, आदिवासी विकास, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, महिला व बालकल्याण.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com