`बापूंचे मंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण करणार`

...
anuradha-nagawade
anuradha-nagawade

श्रीगोंदे : बापूंचे निष्ठावंत असे पांघरुण घेणाऱ्या जवळच्या काही निष्ठावंतांना थेट उत्तर देत जिल्हा परिषद सदस्य अनुराधा नागवडे यांनी काल सोमवारी आक्रमक रुप दाखविले.

बापूंनी समाजासाठी खुप दिले मात्र आता त्यांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपली असून त्यातीलच एक मंत्रीपदाचे स्वप्न आपण संतांचा आशिर्वाद आणि समाजाची साथ घेवून पूर्ण करु अशी घोषणा करुन त्यांनी आमदारकीची तयारी सुरु केल्याचे संकेत दिले.

शिवाजीराव नागवडे (बापू) यांच्या जंयतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात अनुराधा नागवडे यांनी पहिल्यांदाच आक्रमकपणा दाखविला. त्यांच्या भाषणाला असणारी धार अनेकांच्या भुवया उंचविणाऱ्या ठरली. बापूंच्या जवळचे काही जणांनी त्यांच्यावर त्यांचे राजकीय संस्कार असल्याचे सांगत असल्याचा संदर्भ देत त्या म्हणाल्या, तुमच्यावर जर बापूंचे संस्कार आहेत तर त्याचे दोन पुत्र राजेंद्र आणि दीपक यांनी वडिलांकडून काहीतरी घेतले असेलच ना ? केवळ दिशाभूल करण्यासाठी खटाटोप सुरु असतो. कारखान्याची सत्ता लोकांसाठीच असते, हे राजेंद्र नागवडे यांनी कृतीतून दाखविताना वडीलांचे संस्कार दाखवून दिले आहेत.

बापूंचे काही स्वप्न पूर्ण करायचे असल्याचे सांगत अनुराधा नागवडे म्हणाल्या, कारखान्याचा कारभारा चांगला चालविणे हा जसा त्यातीलच एक भाग आहे.  मंत्रीपद मिळविणे हेही त्यांचे स्वप्न् होते. आता गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्यासारख्या संतांचे आशिर्वाद आणि समाजाचे पाठबळ या जोरावर ते आपण पूर्ण करुन दाखवू असे सांगत पुढच्या विधानसभेच्या त्या आजच तयारीला लागल्याचे स्पष्ट संकेत दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com