पाच वर्षे रेंगाळलेला प्रश्‍न मंत्री उदय सामंत यांनी तासात सोडवला

पाच वर्षे रेंगाळलेला प्रश्‍न मंत्री उदय सामंत यांनी तासात सोडवला

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचा प्रश्‍न सर्व प्रशासकीय पुर्तता असतानाही गेली पाच वर्षे रेंगाळला होता. रेंगाळलेला प्रश्‍न मंत्री उदय सामंत यांनी तासाभरात मार्गी लावला आहे. 

यासंदर्भात गेल्या सरकारकडे पाटपुरावा करुनही या विषयाची फाईल तसुभरही पुढे सरकत नव्हती. मात्र उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या समवेत बैठक झाली. यानंतर येत्या दोन आठवडड्यांत याविषयीचा शासननिर्णय काढण्याची घोषणा केली.

या विद्यापीठ उफकेंद्रासाठी तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी 2014 मध्ये जागा उपलब्ध करुन त्याचे आदेशही काडले होते. मात्र त्यानंतर काहीच झाले नाही. त्यामुळे या जागेवर सध्या अतिक्रमण झाले आहे. आता या विषयाला चालना मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे..

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रासंदर्भात येत्या दोन आठवड्यांत शासननिर्णय जारी होऊन त्यानंतर तत्काळ दोन महिन्यांत भूमिपूजन केले जाईल, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्यासमवेत विद्यापीठात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली.

 नागपूरला हिवाळी अधिवेशनात युवासेना विस्तारक व विद्यापीठाचे अधिसभा सदस्य अमित पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेत उपकेंद्राच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले होते.

त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. त्यानुसार शनिवारी विद्यापीठात झालेल्या बैठकीत सामंत यांनी अधिकाऱ्यांकडून उपकेंद्राबाबतची स्थिती जाणून घेतली. नाशिकला विद्यापीठाच्या जागेत भव्य उपकेंद्र उभे राहण्यासाठी दोन आठवड्यांत शासननिर्णय जारी केला जाईल.

त्यामुळे विद्यापीठाचे उपकेंद्र उभारणीचा मार्ग सुकर होईल व पुढील दोन ते तीन महिन्यांत उपकेंद्राच्या आरक्षित जागेत भूमिपूजन केले जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. कुलगुरू करमळकर यांच्यासह प्र-कुलगुरू एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक माने, अधिसभा सदस्य पाटील आदी बैठकीस उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com