मंत्री तनपुरेंनी बोलावूनही नायब तहसिलदार वेळेत आले नाहीत!

विद्यार्थी व नागरिकांना विविध दाखल्यांसाठी अडवणूक करतात, अशा नागरिकांच्या तक्रारी मंत्री तनपुरे यांना प्राप्त झाल्याने, त्यांनी तहसील कार्यालय गाठले. पन्नास टक्के कर्मचारी अनुपस्थित पाहून राग अनावर झाला.
prajakta tanpure
prajakta tanpure

राहुरी (नगर) : राहुरी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कामाप्रती अनास्था...कामकाजातील विसंवाद... दप्तर दिरंगाई... नागरिकांच्या तक्रारीतील तथ्य... हे पाहिल्यावर नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या रागाचा पारा चढला. त्यांनी महसूलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या व नागरिकांना वेठीस धरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशा सूचना मंत्री तनपुरे यांनी तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना दिल्या.

आज मंत्री तनपुरे यांनी राहुरी तहसील कार्यालयात अचानक भेट दिली. तेव्हा, पन्नास टक्के कर्मचारी अनुपस्थित होते. महसूलच्या अनागोंदी कारभारावर मंत्री तनपुरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार छाया चौधरी नागरिकांना अरेरावीची भाषा वापरतात. रेशन कार्ड तयार असूनही देण्यास टाळाटाळ करतात. विद्यार्थी व नागरिकांना विविध दाखल्यांसाठी अडवणूक करतात, अशा नागरिकांच्या तक्रारी मंत्री तनपुरे यांना प्राप्त झाल्याने, त्यांनी तहसील कार्यालय गाठले. पन्नास टक्के कर्मचारी अनुपस्थित पाहून राग अनावर झाला. पुरवठा विभागाच्या लिपिकास दप्तर दिरंगाई बाबत विचारणा केल्यावर, तेही निरुत्तर झाले. नायब तहसीलदार चौधरी यांना बोलावूनही त्या सकाळी साडेदहा वाजेपर्यंत कार्यालयात आल्या नाहीत. त्यामुळे, मंत्री तनपुरे यांनी अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कारवाईची सूचना केली.

तहसील कार्यालयाजवळील सेतू कार्यालयात जाऊन मंत्री तनपुरे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. रस्त्यावरच नागरिकांच्या समस्यांचा निपटारा सुरु केला. मंत्र्यांच्या कारभारावर जनता खुश झाली. परंतु महसूल प्रशासनाचे धाबे दणाणले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com