minister shivtare nabs accident culprit by chasing | Sarkarnama

राज्यमंत्री शिवतारे यांनी धडक देऊन जाणाऱ्या गाडीला पाठलाग करून रोखले

उमेश घोंगडे
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

पुणे : पुणे-सासवड रस्त्यावर भिवरी गावानजिक एका मोटार सायकलला धडक देवून पळून जाणाऱ्या होंडा क्रेटा कारचा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी त्यांच्या वाहनातून पाठलाग केला. धडक देणाऱ्या दोघांनाही पकडण्यात आले असून, त्यातील एकजण पोलिस असल्याचे सांगण्यात येत आहे.

पुणे : पुणे-सासवड रस्त्यावर भिवरी गावानजिक एका मोटार सायकलला धडक देवून पळून जाणाऱ्या होंडा क्रेटा कारचा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी त्यांच्या वाहनातून पाठलाग केला. धडक देणाऱ्या दोघांनाही पकडण्यात आले असून, त्यातील एकजण पोलिस असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिवतारे हे आज (ता. ५ आॅक्टोबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास सासवड येथून पुण्याकडे येण्यास निघाले होते. बापदेव घाटाच्या अलीकडे भिवरी हे गाव आहे. तेथे हा प्रसंगी घडला. या गावानजिक त्यांच्या गाड्यांचा ताफा येत असताना विरुद्ध बाजूने येणाऱ्या होंडा क्रेटा कारने एका दुचाकीला धडक दिली. त्यामुळे या दुचाकीवरील दोघेहीजण खाली पडले. कारचालकाने या जखमी लोकांना मदत करण्याचे सोडून आपली गाडी वेगाने पुढे नेली. हे शिवतारे यांनी पाहिले. त्यांनी आपली गाडी उलट्या दिशेने फिरवायला सांगितली आणि त्या कारचा पाठलाग केला. त्यांच्या ताफ्यातील इतर वाहनांना जखमी लोकांना मदत केली.

काही मीटर अंतर पाठलाग केल्यानंतर अपघात करणाऱ्या कारला थांबविण्यात आले. त्यात दोघेजण होते. त्यातील एकाकडे पोलिसांचे ओळखपत्र सापडले. दोघेही दारू पिलेल्या अवस्थेत असल्याचा संशय शिवतारे यांनी व्यक्त केला.

याबाबत शिवतारे यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले की बेदरकारपणे वाहने चालवून दुसऱ्याला अपघात करायचा आणि जखमींना मदत करण्यासाठीही थांबायचे नाही, ही विकृती आहे. मी या अपघाताबाबत सासवड पोलिसांना तातडीने कळविले असून, आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख