रावतेंच्या सातारा दौऱ्यात लोकसभेचा उमेदवार ठरणार?

रावतेंच्या सातारा दौऱ्यात लोकसभेचा उमेदवार ठरणार?

सहा विधानसभा मतदारसंघात स्वतंत्र बैठका घेऊन तेथील पक्ष, संघटना बांधणीचा आढावा ते घेणार आहेत.

सातारा : लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर परिवहन मंत्री दिवाकर रावते उद्या (शुक्रवार) पासून दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सहा विधानसभा मतदारसंघात स्वतंत्र बैठका घेऊन तेथील पक्ष, संघटना बांधणीचा आढावा ते घेणार आहेत. 

शिवसेनेने युती होऊ अथवा न होऊ स्वबळावर लढण्याची भुमिका ठेऊन सातारा जिल्ह्यात पक्ष संघटना बांधणी केली आहे. यासाठी संपर्क प्रमुख व कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीनही जिल्हा प्रमुख, उपप्रमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी बुथनिहाय बांधणी केली आहे. या सर्व बांधणीचा आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते उद्या (शुक्रवार)पासून दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते कऱ्हाड उत्तर, सातारा, कोरेगाव, माण-खटाव, फलटण व वाई-खंडाळा-महाबळेश्‍वर विधानसभा मतदारसंघात स्वतंत्र बैठका घेऊन आढावा घेणार आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com