जनतेला दिलेला शब्द सत्तेच्या माध्यमातून खरा केला : प्रा. राम शिंदे   

.
RAM_SHINDE
RAM_SHINDE

कुळधरण :  कर्जत - जामखेड तालुक्यातील जनतेला दिलेला शब्द सत्तेच्या माध्यमातुन पुर्ण होत आहेत. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटक हा आज भाजपावर खुश आहे. त्यात येणाऱ्या कालखंडात भाजपाचा विजय निश्चित असल्याने पुढील पर्वासाठी तुंम्हा सर्वांचे आशिर्वाद माझ्या पाठीशी राहु द्या, असे आवाहन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

खांडवी, भोसे ( ता. कर्जत ) येथील विविध विकास कांमाचे उद्घाटन प्रा. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, बाजार समितीचे सभापती श्रीधर पवार, संचालक संपत बावडकर, शांतीलाल कोपनर, मंगेश जगताप, राहुल गांगर्डे, सरपंच प्रविण तापकीर, संजय तापकीर, भाऊसाहेब तापकीर, सरपंच नारायण खराडे, दादा खराडे, दत्ता खराडे, संतोष क्षिरसागर प्रविण खराडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. 

यावेळी पुढे बोलताना शिंदे म्हणाले की ,मी जनतेला खोटी आश्वासने कधीच दिली नाहीत. त्यामुळे आजही ग्रामिण भागातील विकास कामांचे नारळ निवडणुकीच्या तोंडा पर्यंत नारळ फुटतील इतकी विकास कामे चालु आहेत. त्यासाठी किमान सहा महिने  मला उद् घाटने  करावे लागतील. तरी दिवस कमीच पडतील, असे प्रा. शिंदे यांनी यावेळी सांगितले.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com