minister prajakta tanpure story | Sarkarnama

प्राजक्त तनपुरेंवर 'मामांची कृपा'!

मुरलीधर कराळे
सोमवार, 30 डिसेंबर 2019

आमदार प्राजक्त तनपुरे यांचे आजोबा बाबुरावदादा तनपुरे हे दहा वर्षे आमदार राहिले. परंतु त्यांना मंत्रीपदी संधी मिळाली नव्हती. तसेच वडील प्रसाद तनपुरे हे एकदा खासदार आणि  25 वर्षे आमदार होते. त्यांनाही मंत्रीपदापर्यंत जाता आले नाही.

नगर : राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे आज मंत्री झाले. प्राजक्त यांचे हे मंत्रीपद 'मामांची कृपा' मानली जात आहे.

नगर जिल्ह्यातून मंत्री कोण होणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता होती. अखेर आज आमदार प्राजक्त तनपुरे यांचे नाव पुढे आले. पहिल्यांदाच आमदार होऊनही मंत्रीमंडळात वर्णी लागल्याने तनपुरे कुटुंबियांत आज जल्लोष साजरा झाला. आमदार तनपुरे हे माजी खासदार प्रसाद तनपुरे व नगराध्यक्षा उषा तनपुरे यांचे पूत्र होत. प्रसाद तनपुरे 25 वर्षे आमदार होते. नंतर पाच वर्षे खासदार होते. परंतु या काळात त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली नाही. ते शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ होते. पवार यांनी काँग्रेस सोडल्यानंतर राष्ट्रवादीची स्थापना केली. तेव्हा तनपुरे त्यांच्यासोबत आले.

आमदार प्राजक्त तनपुरे यांचे आजोबा बाबुरावदादा तनपुरे हे दहा वर्षे आमदार राहिले. परंतु त्यांना मंत्रीपदी संधी मिळाली नव्हती. तसेच वडील प्रसाद तनपुरे हे एकदा खासदार आणि  25 वर्षे आमदार होते. त्यांनाही मंत्रीपदापर्यंत जाता आले नाही. परंतु वर्षानुवर्ष आमदारकी घरात असतानाही मंत्री होता न आल्याचे शल्य तनपुरे कुटुंबियांना होते. ते स्वप्न आज पहिल्यांदाच निवडून आलेल्या प्राजक्त तनपुरे यांनी पूर्ण केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उषा तनपुरे या भगिणी आहेत. त्यामुळे भाचे आमदार प्राजक्तसाठी मामांनी उमेदवारी देणे साहजिकच होते. त्यामुळे पहिल्यांदाच निवडून येवूनही थेट मंत्री होण्याचे भाग्य आमदार तनपुरे यांना लाभले. याशिवाय तरुण व संयमी म्हणून आमदार तनपुरे यांची ओळख आहे. अभ्यास करूनच प्रश्न मांडून त्यावर उत्तर शोधण्याचे कसब त्यांच्यात आहे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख